मोहझरी ग्रा.पं. च्या उपसरपंच पदी श्रीरंग कुमरे यांची अविरोध निवड


मोहझरी :- आरमोरी तालुक्यातील मोहझरी, ग्रा. पं. ची निवडणूक सन 2021 ला झालेली होती त्यावेळेस संतोष अन्नाजी निकुरे यांची उपसरपंच म्हणून निवड करन्यात आली होती .परंतु दीर्घ आजाराने त्यांचा मृत्यू झाल्या त्यामुळे उपसरपंच पद रिक्त तब्बल एक वर्ष नंतर दि. ३०/१२/२०२२ रोजी झालेल्या उप- सरपंच पदाची निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. नामनिर्देशक फार्म पाच सदस्यांनी टाकले असतांना त्यांनी नामनिर्देशन फार्म वापस घेऊन आज श्रीरंग फागोजी कुमरे यांची अविरोध उपसरपंच पदी निवड करण्यात आली.

यावेळी ग्रामपंचायत सरपंच मयुर कोडाप सदस्य राजू टेंभुर्णे ,मोतीराम बावणे, पपीता टेकाम ,शैला लोनबले, वच्छाला मडावी ,मनीषा कुमरे, मंदा भानारकर तसेच मंडळ अधिकारी किरंगे साहेब यांचे सहकार्य यावेळी लाभले.


मा. सरपंच, ग्रा. सदस्य आणी नागरीकांच्या सहकार्याने ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या समस्‌या तातडीने सोडविल्याचा प्रयत्न मी नक्कीच करेन.

- श्रीरंग कुमरे नवनवीन उपसरपंच तथा ग्रां सदस्य

Post a Comment

Previous Post Next Post