कुरखेडा तालुक्यातील रामगड येथे कातडी आणि 11 नखे जप्तप्रकरणी तीन आरोपींना झाली अटक



दिनेश बनकर कार्यकारी संपादक 

गडचिरोली / कूरखेडा-पूराडा वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय अंतर्गत येणार्या रामगड ( वागदरा) येथील जगंलात एका झाडात दडवून ठेवण्यात आलेला बिबट या वन्यप्राण्याची कातडी व ११ नखे गोपनीय माहीती वरून वनविभागाद्वारे जप्त करण्यात येत या संदर्भात ३ आरोपीना अटक करण्यात आली


विनायक मनिराम टेकाम (३९) मोरेश्वर वासूदेव बोरकर (४५) मंगलसिगं शेरकू मडावी (५०) सर्व रा रामगड ( वागदरा) असे आरोपी चे नावे असून त्यांचा कडे बिबटची कातडी व नखे आहेत व आरोपी त्याची विक्री किंवा मांत्रीकाकडून झडत्या हा अंधश्रध्देचा प्रकार करण्याचा बेतात असल्याची गोपनीय माहीती वनविभागाला गोपनीय सूत्राकडून माहिती मीळाली होती या माहीतीचा आधारे आज वनविभागाने सापळा रचत आरोपीना अटक करीत जगंलातील झाडात दडवून ठेवण्यात आलेली बिबटची कातडी व नखे जप्त केले व आरोपी विरोधात वन्यजिव संरक्षण अधिनियम १९२७ चे कलम २ (१६) ९, ३९, ४९, ५२, ५७ वाचा कलम ५१ तसेच भारतीय वन अधिनियम १९२७चे कलम (२६) (१) अन्वये वनगून्हा दाखल केला सदर कार्यवाही मूख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) रंगनाथ नाईक विभागीय वन अधिकारी (दक्षता) प्रितमसिगं कोडापे यांचा मार्गदर्शनात वनसंरक्षक प्रादेशिक गडचिरोली डॉ कीशोर मानकर उपवनसंरक्षक वडसा धनंजय वायभासे उपविभागीय वन अधिकारी कूरखेडा मनोज चव्हाण वनपरिक्षेत्र अधिकारी पूराडा बालाजी डिगोळे क्षेत्र साहायक संजय कंकलवार, कामचंद ढवळे, वनरक्षक भरत रामपूरकर, अमर कन्नाके, शामराव कूळमेथे, सूरेश रामटेके, सूनंदा मडावी, गंगाधर ने, गंगाधर नन्नावरे यांचा चमू द्वारे करण्यात आली आरोपीना आज कूरखेडा न्यायलयात हजर करण्यात आले यावेळी न्यायलयाने ७ दिवसाची वनकोठडी सुनावली आहे.


आरोपी कडे बिबटची कातडी व नखे कूठून आले, बिबटची आरोपी कडून हत्या करण्यात आली का, या प्रकरणात पून्हा आरोपी आहेत का, या घटनेत शिकारी टोळीचा सहभाग आहे का या प्रश्नाची उकल वनकोठडीत असलेल्या आरोपी कडून होण्याची शक्यता वन विभागाकडून व्यक्त करण्यात आलेली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post