120 महिलांसोबत शारीरिक संबंधाचे व्हिडीओ सापडले अन बाबा ताब्यात..


देशात एक अत्यंत खळबळजनक अशी घटना काही वर्षांपूर्वी उघडकीला आलेली होती. हरियाणातील तोहना येथील बलात्कार प्रकरणात अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने जिलेबी बाबा याला दोषी ठरवले असून शनिवारी या बाबाला शिक्षा सुनावण्यात येणार आहे. अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश बलवंत सिंग यांच्या न्यायालयाने या बाबाला दोषी ठरवले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, अमरपुर असे याचे नाव असून एका ठिकाणी हा बाबा जिलेबीचा ठेला लावत होता. त्यानंतर काही कालावधीत त्याने मोठ्या प्रमाणात पैसे कमावले आणि आपल्यामध्ये दैवी शक्ती असल्याचे सांगत महिलांना बेशुद्ध करून त्यांच्यावर अत्याचार केले. ब्लॅकमेल करत तंत्र मंत्र याचा आधार घेत त्याने अनेक महिलांना आपल्या वासनेची शिकार बनवले आणि त्या व्हिडिओच्या आधारे ब्लॅकमेल करत तो मनमानी पद्धतीने त्यांना त्याच्याकडे बोलावून घेत असायचा.


जलेबी बाबा याचे खरे नाव अमरपुर उर्फ टिल्लू असून त्याच्यावर बलात्कार ब्लॅकमेलिंग अशा अनेक केसेस दाखल आहेत. पोलिसांनी त्याच्याकडे धाड टाकली त्यावेळी त्यांच्याकडे तब्बल 120 महिलांचे आक्षेपार्ह अवस्थेतील व्हिडिओ आढळून आले होते त्यामध्ये तो त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवत ठेवताना दिसून आलेला होता. त्याच्याकडे काही नशेच्या गोळ्या देखील आढळून आल्या होत्या.


वीस वर्षांपूर्वी तो पंजाब इथून तो तोहना इथे आलेला होता. येथे आल्यानंतर त्याने जिलेबीचे दुकान लावले आणि दुकान व्यवस्थित असताना अचानकपणे त्याच्या पत्नीचे निधन झाले त्यानंतर तो खचून गेला आणि त्याने पंजाबला जाऊन आपण तांत्रिक विद्या शिकून आलेलो आहोत असे सांगत पुन्हा तोहना इथे आपला आश्रम सुरू केला होता. तिथे तो महिलांना आपल्या जाळ्यात ओढायचा आणि त्यानंतर त्यांना नशेचे पदार्थ देऊन त्यांच्यावर अत्याचार करत होता. त्याला आता काय शिक्षा ठोठावली जाईल याकडे देशाचे लक्ष लागून राहिले आहे

Post a Comment

Previous Post Next Post