फक्त तूच हवास ‘, प्रियकरासाठी तरुणीने केली काळी जादू


सोशल मीडियावर सध्या एका महिलेच्या प्रेमप्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असून एका व्यक्तीच्या प्रेमात आकंठ बुडून गेलेली होती मात्र त्यानंतर त्याने तिला दगा दिला तेव्हापासून ती त्याच्या प्रेमात वेडी झाली तिने आपले प्रेम मिळवण्यासाठी चक्क अंधश्रद्धेचा आधार घेतला आणि त्याच्या आधारे आपण प्रियकराला वश करून अशी तिची धारणा होती मात्र त्यामध्ये तिची आर्थिक फसवणूक झालेली आहे.

चीन येथील ही घटना असून माई असे या तरुणीचे नाव आहे. तिचा प्रियकर तिला सोडून गेला आणि त्याचे इतरत्र अफेअर सुरू झाले ही माहिती समजल्यानंतर माई हिने कुठल्याही परिस्थितीत त्याला मिळवण्याचा चंग बांधला आणि त्यानंतर तिने टिकटॉकवर एका ज्योतिषाचा व्हिडिओ पाहिला आणि त्याला संपर्क केला सुरुवातीला तिने स्वतःचे भविष्य जाणून घेण्यासाठी त्याला काही रक्कम दिली त्यानंतर त्याने तुला तुझा प्रियकर मिळवून देतो फक्त तुला काही काळ्या जादूच्या गोष्टी कराव्या लागतील असे सांगत तिच्याकडून पैसे उकळण्यास सुरुवात केली.


आत्तापर्यंत पीडित तरुणीला आतापर्यंत सुमारे दीड लाख रुपयांचा फटका बसलेला असून त्यानंतर तिने पोलिसात धाव घेतलेली आहे. तरुणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी काळी जादू आणि ज्योतिषी यासंदर्भात याचा वापर करून नागरिकांना फसवणाऱ्या एका व्यक्तीला ताब्यात घेतले असून प्रेमात फसवणूक झालेल्या व्यक्ती त्यांच्या निशाण्यावर असायच्या. पोलीस तपासातून आत्तापर्यंत त्यांनी तब्बल एक कोटी रुपये लुबाडल्याचे समोर आले आहे.



Post a Comment

Previous Post Next Post