सरपंच म्हणतो हे घे 34 लाख अन् मला करून दे 10 कोटी रुपये


पुणे:- ५० लाखांच्या खंडणीसाठी मार्केट यार्डातून तिघांचे अपहरण झाल्याची घटना समोर आली होती. पुणे पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावन्याय काही तासातच यश आले आहे. अपहरण झालेल्या तिघा जणांची सुटका केली आहे. या प्रकरणाचा मास्टरमाईंड आदेश नागवडे हा श्रीगोंदा तालुक्यातील वांगदरी गावचा सरपंच असल्याचे समोर आले आहे. सध्या तो फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले
अपहरण झालेल्या पीडितांकडे सरपंचाने काळे पैसे पांढरे कारण्यासाठी ३४ लाख रुपये दिले होते. प्रोसेसिंग फी आणि टोकन अमाऊंटच्या नावाखाली हे पैसे त्यांनी घेतले होते. सरपंचाला १० कोटी रुपये पांढरे करून हवे होते. मात्र ठरल्याप्रमाणे पीडित व्यक्तीने त्यांना काळ्याचे पांढरे पैसे करून दिले नाहीत. त्यामुळे सरपंच व त्याच्या साथीदारांना संशय आला. त्यातूनच त्यांनी या तिघांचे अपहरण केल्याचा आरोप आहे.

अपह्रत ते मूळचे मुंबई साकीनाका येथील राहणारे आहेत. एक जण फिर्यादींचा भाऊ आहे. तेथील एका कंपनीत ते प्रतिनिधी म्हणून काम करतात, तर इतर दोन व्यक्तींमध्ये एक नातेवाईक तर तिसरा त्यांचा मित्र आहे. कंपनीच्या कामानिमित्त गुरूवारी दुपारी ते मार्केटयार्ड परिसरात आले असताना, बारा वाजताच्या सुमारास दोन चारचाकी गाडीतून त्यांचे तिघांचे अपहरण करण्यात आले होत

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पाच पथकांनी तांत्रिक विश्लेषण व नगर पोलिसांच्या मदतीने तिघांना काही तासात श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील एका लॉजवरून ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी अपहरणकर्ते प्रवीण शिर्के, विजय खराडे आणि विशाल मदने (रा. तिघेही. नगर) अशी पकडण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. तर, त्यांचे इतर साथीदार फरार झाले असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.याबाबत एका अपह्रत व्यक्तीच्या भावाने मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post