40 वर्षानंतर महिला छान का दिसतात...


या वयात बहुतेक करून सगळे अनुभव घेऊन तावून सुलाखून निघालेले असतो. सासर माहेरच्या नातेवाईकांचा सूर आणि नूर ओळखलेला असतो.नवरा आणि मुलं यांच्या बद्दलच्या भ्रामक कल्पना जाऊन वास्तवता स्वीकारलेली असते. हे मला करायचे आहे आणि हे मी करणार नाही असे स्वच्छ चित्र डोळ्यासमोर उभे असते. यामुळे आयुष्य सरळ आणि सोपे वाटायला लागले आहे.

सुरक्षित अंतर ठेवून सगळे सणवार नातीगोती सांभाळली जातात. मुलांना त्यांची space प्यारी असल्याने आपणच स्वत: ला आवरलेले असते.रोजची कामं लीलया करून आपण आपले जग निर्माण करायला मोकळ्या असतो. नवरोबाही घरातले सगळे सांभाळ आणि काय करायचे ते कर या स्टेजला आलेला असतो.

त्यामुळे खऱ्या अर्थाने आपण मोकाट सुटलेले असतो. आपले छंद, अनेक वर्षात न भेटलेल्या मैत्रिणी, सोशल मिडिया यात जीव नकळत रमायला लागतो.आपल्या वागण्या बोलण्यात आता वेगळीच परिपक्वता आलेली असते त्यामुळेच 40 शीचा रंगच न्यारा असे आज वाटत आहे. माझ्या या वयातल्या मैत्रिणींच्या चेहऱ्यावर जो आत्मविश्वास आणि वेगळीच झळाळी दिसते याच गुपित आज उमगले आहे .या अवस्थेला व्यक्त करण्यासाठी *पंछी बनू उडती फिरू मस्त गगन में* हे गाणे योग्य आहे.


Post a Comment

Previous Post Next Post