बायको कितीही सुंदर असली तरीही पुरुष दुसऱ्या महिलांकडे का आकर्षित होतात ! जाणून घ्या…


नाविन्याची आवड ही प्रत्येक मानसात असते .त्याला स्री पुरुष असा भेदभाव करता येणार नाही.ज्याला बुध्दि आहे तो ती वापरतो त्यात गैर असे काहिच नाही.स्री या सुध्दा पुरुषाकडे बघत असतात.त्याना सुध्दा भावना असतात.स्री ला नटण्या,मुरडन्याची आवड असते ती कोणाला दाखविण्यासाठी असते.

हल्ली समाजात नजर फिरवली तर असा भेद न केला तर ठिक आहे.स्री यांची मानसिकता सुध्दा बदललेली आहे.टाळी एका हाताने वाजत नाही.त्यामूळे वरिल प्रश्नातील भेदकता तितकिसी आता राहिली नाही .विरुध्द लिंगा विषयी आकर्षण निर्माण होणे हे निकोप आरोग्याचे लक्षण आहे.

कुठल्याही सुंदर गोष्टीकडे पहाणे हा त्या वस्तूचा ,व्यक्तीचा सन्मान समजला पाहिजे.उलट पहानारयाला दाद दिली पाहिजे.दर्दी लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढायलाच हवीघरात राहण्याची कल्पना आता बायका सुध्दा मान्य करायला तयार नाहीत.घरात प्रत्येकाची घुसमट होत असते.

कला आणि सौंदर्याची उधळण केली पाहिजे.स्तुतीसुमनांनी मन भरून गेले पाहिजे.नवरा किवा बायको स्तुती करताना नेहमी कंजूशी करतात.पण तो परका पुरुष किवा स्री मात्र स्तुती करताना वाहुन जात असतो.बिलकूल थकत नाही.मानसिकता बदलली आहे.जग खूप बदललेल आहे.

खाण्या पिण्याच्या सवयी,कपड्यांचा बाज,दाग दागिन्यांची हौस,प्रत्येकाला असतेच पण त्याच बरोबर स्री पुरुषातील शरीराची रचना मनाला मोहवत असते.नजर मापे घेत असते.मुलीचे लग्नानंतर बाईत रुपांतर झाले की ती जरा सैल सुटते,आणि सैल वागायला पण लागते.

शरीर वेगळच चैतन्य निर्माण करते व स्तुती साठी आसुसले जाते.मग पुरुष बघतो असं तिला समजते तेव्हा तिला सुध्दा बरं वाटतं ती सुखावते.मी इतर स्रियांपक्षा सुंदर आहे याची जाणीव तिच्या मनात षटकार ठोकते.मग तिला ती सवय लागुन जाते.याचा अर्थ ती वाईट, बाहेरख्याली झाली असला प्रकार नाही.

सुंदर असणे आणि सुंदर दिसणे ह्यात फरक आहे.बायको ही नवरयासाठी सुंदर असते.पण इतराना ती सुंदर दिसते.ह्या दिसण्यातच खरी मजा आहे.जसा छेफ,आचारी स्वयंपाक करतो तो त्याचे काम करून मोकळा होतो.पण खाणारे मात्र मनमुराद आनंद,आस्वाद घेत असतात.हे त्या छेफ ला आवडत असते.इथे नवरयाला जरी आवडत नसेल तरी बायकोला स्तुती आवडत असते..

Post a Comment

Previous Post Next Post