देशातील पहिल्या महिला शाळेची अवस्था दयनीय!


देशातील पहिल्या महिला शाळेची अवस्था दयनीय!
महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीमाई फुले यांनी केली होती स्थापना
पुणे: आज सावित्रीमाई फुले यांची जयंती आहे, ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य महिलांच्या हक्कांसाठी समर्पित केले. त्यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव या छोट्याशा गावात झाला. सावित्रीमाई फुले या भारतातील पहिल्या मुलींच्या शाळेच्या पहिल्या मुख्याध्यापिका आणि पहिल्या शेतकरी शाळेच्या संस्थापक होत्या. त्यांना भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखले जाते.



त्यांचे पती ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सावित्रीमाई फुले यांनी १८४८ मध्ये भिडेवाड्यात पुण्यात मुलींच्या शाळेची स्थापना करत देशात शिक्षणाचा पाया घातला होता.



महिलांना सुशिक्षित करण्यासाठी, १८४८ मध्ये त्यांनी पुणे येथे देशातील पहिली मुलींची शाळा स्थापन केली. मात्र या ऐतिहासिक वारशाची अत्यंत वाईट अवस्था आहे. महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीमाई फुले यांनी १७५ वर्षांपूर्वी पुणे शहरातील भिडेवाडा येथे महिलांची शाळा सुरू केली. मात्र, ही शाळा आतावर्षानुवर्षे बंद असून, तिची अवस्था पाहता ही इमारत कोणत्याही क्षणी कोसळेल, असे वाटते.



स्वातंत्र्यापूर्वी, जेव्हा काही निवडक महिला शिक्षण घेऊ शकत होत्या, तेव्हा गरीब महिलांना शिक्षण देऊन सक्षम करण्याच्या उद्देशाने या शाळेची स्थापना करण्यात आली. या शाळेचे राष्ट्रीय स्मारक करण्याची मागणीही पुढे आली. मात्र आज या शाळेची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे.



सावित्रीमाई फुले या देशातील पहिल्या महिला शिक्षिका आणि सामाजिक कार्यकर्त्या होत्या. त्या भारतातील पहिल्या मुलींच्या शाळेच्या पहिल्या मुख्याध्यापिका आणि पहिल्या शेतकरी शाळेच्या संस्थापक होत्या.

Post a Comment

Previous Post Next Post