क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले" यांची जयंती उत्साहात साजरी...*

*क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले" यांची जयंती उत्साहात साजरी...*


आरमोरी... स्थानिक आरमोरी येथील जेतवन बोद्ध विहारात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती शालिनीताई गेडाम मॅडम होत्या.प्रमुख अतिथी स्थानी महिला लोक आयोगाच्या श्रीमती मा. मंजुषाताई दोनाडकर होत्या.कार्यक्रमाची सुरुवात क़ांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती सौ.आशा बोरकर, श्रीमती मा. रेखा खोब्रागडे, श्रीमती मा. कूंदा खोब्रागडे ह्या होत्या. क़ांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जिवन कार्यावर अनेक महिलांनी आपल्या भाषण, ओव्या व कविता म्हणून कार्यक़माची शोभा वाढविली. तसेच अनेक प्रोत्साहन स्पर्धा घेऊन तथा महिलांना बक्षीस वितरण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंजली रोडगे, संचालन विद्या चौधरी व आभार प्रदर्शन वंदना शेंडे यांनी केले.कार्यक़माच्या यशस्वीतेसाठी भारती मेश्राम, रेखा बांबोळे, रंजना वाकडे, सपना खोब़ागडे, शितल खोब्रागडे, श्रुती गेडाम, सविता जूवारे, खूशबू लोणारे, मीना बांबोळे, शिल्पा खोब्रागडे, भाग्यश्री वाकडे, वनमाला सूखदेवे, शोभा बारसागडे, शारदा उंदिरवाडे, नैना रामटेके, भाग्यश्री खोब्रागडे, पोर्णिमा वाकडे, श्रेया उंदिरवाडे, अनू रामटेके, माया बोरकर, सारिका बोरकर, मिना बांबोळे, निर्मला रामटेके, ज्योती शेडमाके, पूष्पा लोणारे, चंदा मूलमूले, नलू गोवर्धन, शालू वाकडे, माधूरी बांबोळकर, बनाबाई सूखदेवे, भावना बारसागडे, बेबिनंदा खोब्रागडे, नयना रामटेके, लोपमूद़ा ठवरे अशा अनेक महिला उपस्थित होत्या.

Post a Comment

Previous Post Next Post