सहा महिन्यात सिमेंटचे रस्ते उखडले.

सहा महिन्यात सिमेंटचे रस्ते उखडले.


    जळगाव शहरातील रस्ते मागील दहा वर्षात बनत नव्हते.आता बनले तर ते असे अल्पजिवी.बनवले अणि सहा महिन्यांनंतरच उखडून बरबाद झाले.
      जळगाव शहरातील प्रभाग नंबर १२ मधे स्टेट बँक कॉलनी जवळील हा सिमेंट चा रस्ता.फेब्रुवारी २०२२ मधे सिमेंट चा केला ,असे हे बोर्ड दर्शवते.२० वर्षे टिकला पाहिजे होता.पण फक्त सहा महिन्यात उखडला.असे येथील महिलांनी सांगितले.म्हणे एकच दिवस पाणी टाकले.बस्स! कोणीच वाली नाही.सगळेच चोर.नगरसेवक व शहर अभियंता यांनी मक्तेदाराला फुकट सोडले असेल का? मक्तेदार म्हणतो अर्धा निधी तर या चोरांना वाटला.तर मग,मी शेती ,घर, दागिने विकून सिमेंट आणू का? तुमचेच नगरसेवक आणि शहर अभियंता ३५ टक्के कमीशन घेतल्याशिवाय आमचे पेमेंट देत नाही.आम्हाला मेहनतीचा १५ टक्के मार्जीन पाहिजे.आता ५० टक्के वजा जाता सिमेंट कसे टाकणार?



      मी येथील महिला नागरिकांना नगरसेवकांची नावे विचारली तर कोणालाही माहीत नाही.पुन्हा विचारले कि, रात्री मताचे पांचशे रुपये वाटायला आले , तेंव्हा चेहरा पाहिला असेल.म्हणे नाही,त्यांचे पंटर रात्री पैसा देऊन गेले.आणि उमेदवार दिवसा हात जोडून गेले.
     काही लोकांना सांगितले कि,ज्यांनी या नगरसेवकांना मत दिले आणि पैसा मिळाला नसेल तर आम्ही मिळवून देतो.या रस्त्याचे कमीशन मिळाले आहे, त्यातून पैसे वाटप करू. 
      महिलांनी विचारले कि, तुम्ही पत्रकार आहात का? म्हटले, पत्रकार हे असे काम करीत नाहीत. 
     जळगाव शहर कोणी बरबाद केले? याचा शोध येथे लागला‌.नगरसेवक हेच जबाबदार आहेत.जर ते जबाबदारी नाकारत असतील तर नगरसेवक बनले कशासाठी? घरच्या भाकरी नगरपालिकेत खाण्यासाठी कि नगरपालिकेतून चोरी करून पोळी भाजण्यासाठी ? 
       जळगाव चे लोक जागृत झाले तर हेच नगरसेवक स्वताचे शेत घर दागिने विकून रस्ता बनवतील.रस्ते नाही बनवून दिले तर पुन्हा पैसे घेऊनही निवडून आणू नका.
      
... शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव.

Post a Comment

Previous Post Next Post