दुचाकीच्या धडकेत विद्यार्थिनी सानिया संजय डोंगरे ठार

एटापल्ली:- ११ व्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. ही घटना आज १२ जानेवारी रोजी ११.३० वाजताच्या सुमारास सीआरपीएफ कॅम्प ते जीवनगट्टा रोडवर घडली. सानिया संजय डोंगरे (वय 19) रा. जीवनगट्टा असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.


Super fast batmi या वेबपोर्टलच्या विदेशातही धुमाकूळ घालून विदेशातून डॉलर येणे सुरु झाले. त्या सर्व विदेशी वाचकांचे मनपूर्वक आभार 🙏🙏🙏🙏🙏


राजमाता राजकुवरबाई कनिष्ठ महाविद्यालय, एटापल्ली येथे 11 व्या वर्गात शिकणारी विद्यार्थीनी सानिया डोंगरे ही कॉलेज वरून पायी घरी चालत जात असतांना सीआरपीएफ कॅम्प ते जीवनगट्टा रोडवर कंगाली याच्या झोपडीजवळ आरोपी इसम नामे पेका मेसो गुंडरू, (वय 40) रा. बांडे, ता. एटापल्ली याने दुचाकी क्रमांक एमएच ३३ इ ९०८१ ने तिला मागून धडक दिली. यात ती गंभीर जखमी झाल्याने तिला ग्रामीण रुग्णालय, एटापल्ली येथे भरती केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर आरोपीचा 6 वर्षीय मुलगा शिव का गुंडरू याच्या डोक्याला मार लागल्याने तो ग्रामीण रुग्णालय, एटापल्ली येथे उपचार घेत आहे.

घटनेची माहिती मिळताच एटापल्ली पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपीला लगेच ताब्यात घेतले. अपघातानंतर जीवनगट्टा व एटापल्ली परिसरातील सुमारे 150 ते 200 नागरिक रुग्णालयात जमा झाले होते. परंतु कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही. मृतक विद्यार्थीनीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय, एटापल्ली येथे ठेवण्यात आलेला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post