मोदी सरकारने वाढवली महागाई,पगार काही पुरत नाही म्हणून घेतली लाच


नंदुरबार, : शाळा सोडल्याचा दाखला व मार्कशीट देण्यासाठी विद्यार्थ्याकडून सुरवातीला 5 हजार रुपये लाच घेतली. त्यानंतर पुन्हा 1600 रुपये लाच घेताना शाळेच्या मुख्याध्यापकाला नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले. नवापूर तालुक्यातील सुळी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक नंदलाल शांताराम शिनकर ( वय – 47 रा. रा. – ५२, साईनगरी,‌ मेन रोड, नवापूर ) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या मुख्याध्यापकाचे नाव आहे. नंदुरबार एसीबीच्या पथकाने ही कारवाई मंगळवारी ( दि.17 ) केली.

याबाबत जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड येथील 35 वर्षीच्या व्यक्तीने नंदुरबार एसीबीकडे तक्रार केली आहे. तक्रारदार यांनी 2017-18 यावर्षी माध्यमिक विद्यालय सुळी येथे इयत्ता दहावीचे शिक्षण घेतले आहे. तक्रारदार यांचा शाळा सोडल्याचा दाखला व मार्कशीट देण्यासाठी मुख्याध्यापक नंदलाल शिनकर यांनी 14 जानेवारी रोजी पाच हजार रुपये घेतले. मात्र शाळा सोडल्याच्या दाखल्यावर त्यांच्या आईचे नाव चुकीचे असल्याने ते दुरुस्त करुन देण्याची मागणी तक्रारदार यांनी केली.

यावेळी मुख्याध्यापक शिनकर यांनी तक्रारदाराकडून शाळा सोडल्याच्या दाखल्यावरील आईचे नाव दुरुस्त करून देण्यासाठी व नाशिक येथील बोर्ड कार्यालयातून त्यांचे मार्कशीट आणून देण्यासाठी दोन हजार रुपये लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी नंदुरबार एसीबीकडे तक्रार केली. पथकाने मंगळवारी पंचासमक्ष पडताळणी केली असता मुख्याध्यापक नंदलाल शिनकर यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सापळा करवाई दरम्यान शिनकर यांना तक्रारदार यांच्याकडून 1600 रुपये लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. नंदलाल शिनकर यांच्यावर नवापूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर , अपर पोलीस अधीक्षक नारायण न्याहळदे, पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबी नंदुबारचे पोलिस उप अधीक्षक राकेश चौधरी पोलीस निरीक्षक समाधान एम. वाघ पोलीस अंमलदार विजय ठाकरे, अमोल मराठे, देवराम गावित यांच्या पथकाने केली.

Post a Comment

Previous Post Next Post