अल्पवयीन पाहुणीचे काढले अश्लील फोटो, नंतर व्हायरल करण्याची धमकी देत लॉजवर बलात्कार


सोलापूर - अल्पवयीन मुलीचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिला लॉजवर नेऊन अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सोलापुरात घडली आहे. याप्रकरणी आरोपी तरुणाला अटक करण्यात आली असून त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सुजित गाडे (वय-२४ रा. सातोली, ता. करमाळा) असे आरोपी तरुणाचे नाव आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अल्पवयीन मुलगी नातेवाईकाच्या घरात असताना सुजित गाडे याने तिचे नको त्या अवस्थेतील फोटो काढले होते. त्यानंतर त्याने पीडितेची लातूर येथे भेट घेऊन हे फोटो व्हायरल करण्याची तसेच जीवे मारण्याची धमकी देत पीडितेला तुळजापूरला नेले. तेथे एका लॉजवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला.

हा प्रकार गेल्या तीन महिन्यापासून सुरू होता. अशी तक्रार पीडितेने पोलिसांत दिली आहे. यानंतर टेंभुर्णी पोलिसांनी आरोपी सुजित गाडे याच्याविरुद्ध पोक्सो आणि अन्य कलमांनुसार अत्याचाराचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता त्याची रवानगी २३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.

पाडिता माढा तालुक्यातील एका गावात नातेवाईकांच्या घरात आली असताना आरोपीने तिचे फोटो काढले होते. त्यानंतर हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार अत्याचार केले होते. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.


Solapur - A shocking incident has come to light that a minor girl was taken to a lodge and tortured by threatening to make her photos viral. This incident has happened in Solapur. In this case, the accused youth has been arrested and sent to police custody. The name of the accused youth is Sujit Gade (age-24, Satoli, Karmala).


 According to the police, when the minor girl was in a relative's house, Sujith Gade had taken pictures of her in an unwanted state. He then met the victim in Latur and took the victim to Tuljapur threatening to spread these photos virally and to kill her. There she was taken to a lodge and raped.

 This has been going on for the past three months. The victim has given such a complaint to the police. After this, the Tembhurni police registered a case of torture under POCSO and other sections against the accused Sujit Gade and arrested him. He was produced in court and sent to police custody till January 23.

 When Padita came to her relative's house in a village in Madha taluka, the accused had taken pictures of her. After that, she was repeatedly tortured by threatening to make these photos viral. This incident created excitement in the area

Post a Comment

Previous Post Next Post