अज्ञात व्यक्तीने जाळले धानाचं पुंजन


अहेरी :- पेरमीली वरून तिन कि.मी. अंतरावर असलेले कोरेली बु. येथील श्री. केसा पोच्या आत्राम यांचे शेतातील धानाचे पुंजन (ढीग) काल सायंकाळच्या वेळेस आग लागल्याने जळून पूर्णपणे खाक झालेले आहेत. सदरील घटनास्थळी निलेश वेलादी सरपंच मेडपली, कपिलदेव आत्राम पोलीस पाटील कोरेली बु. मेश्राम तलाठी कोरेली बु. वासुदेव कोडापे कोतवाल पेरमिली, वारलू आत्राम आलदंडी, शिवराम गर्गम, अशोक आत्राम, . चैतू आत्राम यांच्या उपस्थितीत मोका पंचनामा करण्यात आले.
केसा पोच्या आत्राम यांचे शासनाला भरपाई विनवणी केली.

Post a Comment

Previous Post Next Post