मुलगा भेटला नाही म्हणून चक्क सख्या बहिणीनेने आपल्या लहान बहिणीशी केले अश्लिल चाळे

पुणे :- पुण्यात सख्या बहिणीनेने आपल्या लहान बहिणीशी अश्लिल चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मोठ्या बहिणीवर आता विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विमानतळ पोलिस ठाण्यात एका १८ वर्षीय तरूणीने दिलेल्या फिर्यादीवरून २४ वर्षीय मोठ्या बहीणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १८ वर्षीय तरूणी आणि २४ वर्षीय आरोपी या दोघी बहीणी असून त्या दोघी एकत्र विमाननगर परिसरातील एका रो हाऊसमध्ये राहतात. अठरा वर्षाची बहीण २३ जानेवारी रोजी हॉलमध्ये झोपली असताना मोठी बहीण असलेल्या आरोपीने तिच्याशी अश्लिल चाळे केले.तरूणीला हा प्रकार चुकीचा वाटल्याने तिने पोलिस ठाण्यात धाव घेत मोठ्या बहिणी विरोधात फिर्याद दिली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post