पैसा फेको तमाशा देखो...

गडचिरोली:- जिल्ह्यातील बाराही तालुक्यात मोठ्या प्रमाणावर शासकीय बांधकामे सुरू असून कामांवर एक आगळा-वेगळा प्रकार हल्ली दिसून येत आहे. शासकीय बांधकामांची ई-निविदा परवानाधारक कंत्राटदार टाकतो तर बांधकामावरील मलाई खाण्याचे काम नामधारी ठेकेदार करीत असल्याने बांधकामाची ई-निविदा एकाची तर बांधकामे दुसऱ्याची असे दिसून येत असल्याने शासकीय बांधकामातील भोंगळ कारभार चर्चेचा विषय ठरु लागला आहे.

शासनाच्या वतीने कितीही पॉश प्रणाली आणण्याचा प्रयत्न केला तरी समोरची व्यक्ती शक्कल लढवून त्यावर तोडगा काढण्यासाठी बुद्धीचा पुरेपूर वापर करून सत्तर तिथे बहात्तर लावून घेतो. अशाच प्रकारची स्थिती हल्ली निर्माण झाली आहे. कित्येक शासकीय कामांमध्ये पैसा फेको तमाशा देखो असे होत आहे.ज्यांच्याकडे कंत्राटदारांचा परवाना नाही असेही कार्यकर्ते स्वतःला कंत्राटदार असल्याचे इतरांना भासवून शासकीय यंत्रणेच्या तिजोरीवर डल्ला मारीत आहेत. त्यामुळेच शासकीय कामे झकास ऐवजी भकास होतांना दिसून येतात. यावर आळा घालणे गरजेचे आहे. अन्यथा मलाई खाण्यावर जास्तीत जास्त भर पडून बांधकामे निकृष्ट दर्जाची झाल्याशिवाय राहणार नाही.

Post a Comment

Previous Post Next Post