युवारंग ने नदीपात्रात कचरा पेटी लाऊन उचलला वैनगंगा स्वच्छतेचा विळा व पवित्र स्नानासाठी येणाऱ्या महिलाना कपडे बदलविण्याकरिता नदी पात्रात उभारले टेन्ट.*



*महिलांच्या सुरक्षेसाठी युवारंग नेहमी तत्पर :- मनोज गेडाम , युवारंग उपाध्यक्ष*

आरमोरी :- नेहमी क्रीडा ,आरोग्य, सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रम घेऊन अग्रेसर असणाऱ्या युवारंग तर्फे दिनांक १५ जानेवारी २०२३ ला आरमोरी ब्रह्मपुरी महामार्गावरील वैनगंगा नदीच्या पात्रात मकरसंक्रांती निमित्य पवित्र स्नानासाठी येणाऱ्या महिलांना पवित्र स्नान झाल्यानंतर कपडे बदलविण्यासाठी व्यवस्था उपलब्ध नाही ही बाब ओळखून युवारंग तर्फे महिला भगिनींना कपडे बदलण्यासाठी टेन्ट ची व्यवस्था करण्यात आली व नागरिकांनी आपल्या सोबत आणलेला खाद्यपदार्थ व इतर प्लास्टिक कचऱ्याचे नियोजन करण्यासाठी ठिकठिकाणी युवारंग तर्फे कचरा पेट्या लावण्यात आल्या मागील ६ वर्षापासून युवारंग ने वैनगंगा नदी च्या पात्रातील स्वच्छता करत पर्यावरण संरक्षणाचे कार्य सातत्याने सुरू ठेवले आहे २०२० मध्ये आलेल्या महापुरामुळे वैनगंगा नदीच्या पुलावरील कठडे तुटून वाहून गेले होते त्यामुळे नागरिकांना वैनगंगा नदीच्या पुलावरील प्रवास करतांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावे लागते होते अश्यावेळी युवारंग तर्फे जन आंदोलन व रास्ता रोको आंदोलन करून संबंधित विभागाला कठडे लावण्यास बाध्य केले गेले जनहितासाठी स्वच्छता जणजागृती संबंधित नेहमी युवारंग तर्फे उपक्रम आयोजित करून पर्यावरण जपण्याचा संदेश दिला जातो आहे.

Post a Comment

Previous Post Next Post