एकाच ठिकाणी दोन अपघात; एक ठार तर तिघे जखमी




सावली: येथून जवळच असलेल्या खेडी येथील चंद्रपूर-गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाने दुचाकीला  धडक दिली. यात प्रफुल्ल सुरेश मडावी (३०, रा. सामदा बुज) याचा मृत्यू झाला. काही वेळाने त्याच ठिकाणी पुन्हा एका अज्ञात वाहनाने दुसऱ्या दुचाकीला धडक दिल्याने तीनजण गंभीर जखमी झाले. या दोन्ही घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडल्या.

पहिल्या घटनेत प्रफुल्ल मडावी याचा जागीच मृत्यू झाला. त्याचा मृतदेह घटनास्थळीच पडून होता. अशातच काही वेळाने पुन्हा एका अज्ञात वाहनाने दुसऱ्या दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीवरील राजकुमार बाजीराव गेडाम ( 30 ), लोकनाथ बाबुराव कुळमेथे (४०), वासुदेव रामदास सोनुले (५५, सर्व रा. भादुर्णी, ता. मूल) हे जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनस्थळी एकच गर्दी केली. जखमींना सावली रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील तपास सावली पोलिस करीत आहेत.




Post a Comment

Previous Post Next Post