कारवाफा येथे मानव धर्माची चर्चा बैठक संपन्न




 दिनेश बनकर कार्यकारी संपादक



गडचिरोली धानोरा तालुक्यापासून वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या कारवाफा येथे परमपूज्य परमात्मा एक सेवक सेवाभावी संस्था गडचिरोली अंतर्गत नववे मासिक हवन कार्य निमित्ताने चर्चा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते बैठकीच्या अध्यक्ष स्थानी दिवाकरजी ठेंगरी अध्यक्ष परमपूज्य परमात्मक सेवक संस्था गडचिरोली प्रमुख अतिथी म्हणून गोविंदरावजी दोणाडकर मार्गदर्शक वडसा फाल्गुन मानकर मार्गदर्शक कुरखेडा रवींद्र कांबळे मार्गदर्शक चुरमुरा श्री माननीय गायकवाड सौ चंदाताई राऊत ज्येष्ठ सेविका गिरधरजी लांजेवार दिनेश बनकर पत्रकार व येथील सरपंच तथा पोलीस पाटील ग्रामपंचायत सदस्य गण यांची चर्चा बैठकीला प्रामुख्याने उपस्थिती होती चर्चा बैठकीमध्ये मान्यवरांनी बाबा जुमदेवजी यांनी स्थापन केलेल्या मानव धर्मावर आधारित सखोल असे मार्गदर्शन करून सेवकांना प्रेरित केले चर्चा बैठक बाबा जुमदेवजी यांनी दिलेल्या चार तत्व तीन शब्द पाच नियम या तत्त्वाच्या आधारे घेण्यात आली चर्चा बैठकीमध्ये हुंडाबळी स्त्रीभ्रूणहत्या व्यसनमुक्ती आधी विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. चर्चा बैठकीचे प्रस्ताविक विठ्ठलराव राऊत मार्गदर्शक आरमोरी यांनी केले संचालन माणिक मेश्राम यांनी केले तर आभार प्रदर्शन लांजेवार यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post