मुली लफडा करतात अन् घरातून गायब होतात..


प्रेमाला विरोध होताच सोडतात घर : पोलिसात तक्रार


गडचिरोली : घरच्यांनी प्रेमाला विरोध दर्शविल्यानंतर अनेकदा मुली आई- वडिलांची पर्वा न करता घरातून पलायन करतात. मुलगी अल्पवयीन असल्यास पोलिस तिचा शोध घेऊन पालकांच्या स्वाधीन करतात. मात्र मुलगी सज्ञान असेल तर पोलिस काहीही करू शकत नाही.

फिल्मी स्वप्नरंजन, घरातून पळण्याचा थरार, घरच्यांच्या विरोधात बंड, सिनेमात काम करण्याची हौस, स्वतंत्र जगण्याची इच्छा यासह प्रेमात पडून 'साथ जीने मरने की कस्मे' खाण्याचे इरादे या साऱ्या कारणांसह अल्पवयीन मुली घरातून पलायन • करीत असल्याचे पुढे आले आहे. मात्र, फिल्मी संघर्षाच्या पलीकडे जाऊन जेव्हा वास्तवाचे अंगारे त्यांच्या वाट्याला येतात तेव्हा ते चटके बसल्यानंतर त्यांना घरची आठवण येते. अल्पवयीन मुलींचे घरातून पळण्याचे प्रमाण वाढत आहे. शरीरात जे बदल घडतात, त्याची माहिती तर अपुरी असतेच, पण नेमक्या त्याच काळातील अपुऱ्या आधारामुळे अनेक जण प्रचंड संभ्रमावस्थेत असतात. प्रेम प्रकरणे शारीरिक आकर्षण, त्यात फसणे त्यातून निर्माण होणारे ब्लॅकमेलिंग सारखे प्रश्न, आदी अनेक कारणातून नैराश्यात सापडलेली मुले घरातून पलायन करतात 





महिन्याला ५ अपहरणाचे गुन्हे

मुलासोबत पळून गेलेली मुलगी अल्पवयीन असल्यास मुलाविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल होता. गडचिरोली पोलिस स्टेशनअंतर्गत महिन्याला जवळपास पाच अपहरणाचे गुन्हे दाखल होतात. यातील बहुतांश मुलींना पोलिस शोधून काढून पालकांच्या स्वाधीन करतात.


समुपदेशनाची गरज 

१३ ते १६ या कालावधीत मुलीमध्ये शारीरिक व मानसिक बदल घडून येतात. या कालावधीत त्यांना योग्य समुपदेशनाची गरज असते. मात्र समुपदेशन न झाल्याने त्या पलायन करतात.


Post a Comment

Previous Post Next Post