धान खरेदीत कोतवालाकडून दिशाभूल कासवीतील प्रकार : नागरिकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार




आरमोरी : शासकीय आधारभूत धान उचलही केली आहे. खरेदी केंद्रावर रब्बी आणि खरीप धानाची विक्री केली जाते, मात्र चक्क कोतवालानेच एकाच सातबाऱ्यावर आपल्या व बहिणीच्या नावे मर्यादेपेक्षा जास्त धान विक्री केल्याचे दाखवून पैशाची उचल करून शासनाची फसवणूक केल्याने नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.

कासवी येथे सन २०२२ मध्ये शासनाच्या रोटेशन पद्धतीनुसार इटियाडोह पाटबंधारे विभागामार्फत पाणी दिले जाते. मात्र सन २०२२ मध्ये रब्बी हंगाम नसतानासुद्धा कोतवालाने एकाच सातबाऱ्यावर बहिणीच्या नावाने १७९.४१ क्विंटल धान विक्री केली आहे.तीन लाख ५३ हजार ८० रुपयाची केली आहे.




कासवी येथील कोतवालाचा मुलगा सदर आरमोरी खरेदी-विक्री संस्थेत कार्यरत असून या बाबींचा गैरफायदा घेतला आहे. तालुक्यात व कासवी येथे म्हणावे लागेल. इटियाडोहाचे पाणी शासनाच्या रोटेशन पद्धतीनुसार दिले जाते व शेतात काहीही सिंचनाची व्यवस्था नसतानाही शासनाच्या आदेशाला कोतवालानेच बगल दिली आहे. कासवी येथील कोतवालाकडे ३.२६ एकर शेतजमीन आहे. एकाच सातबाऱ्यावर चार बहिणींची नावे असून आपल्या व साझ्यातील बहिणीच्या नावाने प्रत्येकी ५० क्विंटलची धान विक्री केल्याचे दाखवून शासनाची मोठ्या प्रमाणात दिशाभूल केली आहे



 एकीकडे सर्वसामान्य शेतकरी यांना शासनाच्या परिपत्रकानुसार मर्यादित धानाची विक्री करावी लागते आणि दुसरीकडे मात्र मर्यादेपेक्षाही धानाची विक्री होते हेच म्हणावे लागेल.

कासवी येथील कोतवालानी संस्थेमध्ये पोर्टल केलेला सातबारा व आधार कार्डाची चौकशी करून शासनाची दिशाभूल करून मर्यादेपेक्षा विकलेल्या धानाचे पैसे वसूल करण्यात यावे व सेवेतून बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणी कासवी तलाठी नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. याची चौकशी झाल्यास मोठे घबाड उघडकीस येऊ शकते.

Post a Comment

Previous Post Next Post