भगिनींनो अन्याय अत्याचार विरुद्ध लढायला शिका माजी मंत्री विजय भाऊ वडेट्टीवार


भगिनींनो अन्याय अत्याचार विरुद्ध लढायला शिका
माझी मंत्री विजय भाऊ वडेट्टीवार
अजूनही महिला वरील अन्याय अत्याचार थांबले नाहीत तेव्हा भगिनींनो आपण सावित्री बाई फुले यांचा विचाराने प्रेरित होऊन लढायला शिका असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे माझी कॅबिनेट मंत्री विजय भाऊ वडेट्टीवार यांनी महिलांना केले.
  मालडोंगरी येथील १ जानेवारी शोर्य दिन आणि सावित्री बाई फुलेंच्या जयंती निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते .या प्रसंगी दलित मित्र माझी प्राचार्य डी. के.मेश्राम यांचाही मालडोंगरी महिला मंडळ व बौद्ध समाजाच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला 
           
 शैक्षणिक , सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय केलेल्या कार्याबद्दल दिलेली पावती म्हणजे मालडोंगरी वासिनी केलेला सत्कार होय असे डी. के मेश्राम यांनी आपल्या मनोगतातून विचार व्यक्त केले v सत्यवानाची बनण्या पेक्षा ज्यातीबाची सावित्री बना असे उपस्थित महिलांना आवाहन केले . याप्रसंगी माझी जिल्हा परिषद सदस्य डॉ.प्राध्यापक राजेशजी कांबळे , तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष खेमराज जी तिडके, डॉ नामदेवजी किरसान,सौ.स्मिता पारधी यांनीही आपले विचार व्यक्त केले .
           मंचावर जगदीशजी आमले, राहुलजी शिवणकर, सोनुभाऊ नाकतोडे,सुधीरजी पंदीलवार, राजेशजी पारधी,सौ मंजुषा ठाकरे,विनोदजी घोरमोडे,हिरालालजी पेंटर,विनोदजी बरडे,नितीनजी घोरमोडे , सौ धनश्री सिडाम, राजुजी पिलारे आदी मान्यवर मंचावर होते.
संचालन दयाल धनविजय यांनी केले व सुजाता जनबंधू यांनी उपस्थितांचे आभार मानले रात्रो बुद्ध भीम गीतांचा नृत्याचा कार्यक्रम पार पाडला समाजाच्या कार्याला नेहमी तयार असलेले अंकुश चाहांदे, राजन मेश्राम, साहेबलाल निहाटे, आकाश लोखंडे,चंदू गायकवाड, प्रसन्ना निहाटे,अतुल शेंडे यांना पूर्ण कार्यक्रम यशस्वीरीत्या पार करण्या करिता नवतरुण मंडळ,रमाई महिला मंडळ,तसेच बौद्ध समाजातील मंडळाने परिश्रम घेतले

Post a Comment

Previous Post Next Post