माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल





भाजपा तालुका अध्यक्ष रवी नेलकुद्री यांनी केली होती तक्रार

   अहेरी :-    विधानपरिषद नागपूर शिक्षक मतदारसंघात निवडून जाहीर होहून सर्वत्र आदर्श आचारसंहिता लागू असतांना अहेरी तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी नुकतेच भूमिपूजन केले होते, ह्यामुळे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन झाले असून ह्या विरुद्ध भाजपा अहेरी तालुका अध्यक्ष रवी नेलकुद्री यांनी जिल्हाधिकारी संजय मिना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी कुमार आशीर्वाद, अहेरीचे तहसीलदार ओंकार औतारी यांच्याकडे लगेच रीतसर तक्रार करून त्वरित गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती..!!
          चौकशीत सत्यता दिसून आल्याने अहेरीचे नायब तहसीलदार दिनकर खोत यांच्या तक्रारी वरून अहेरी पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमाखाली माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार सह 8 लोकांवर काल गुन्हा दाखल करण्यात आले आहे, ह्यामुळे अहेरी विधानसभा क्षेत्रात मोठी खडबड उडाली असून, अनेकांचे दाबे दणाणले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post