एटापल्ली येथे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते भव्य नाईट बॅडमिंटन स्पर्धेचे उदघाटन संपन्न




एटापल्ली येथे राजमुद्रा फाऊंडेशन प्रेरित श्री राम बॅडमिंटन एटापल्ली द्वारा आयोजित भव्य नाईट बॅडमिंटन स्पर्धेचे उद्घाटन गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा. राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या शुभ हस्ते काल करण्यात आले. या स्पर्धेचे शुभारंभ दीप प्रज्वलन करून करण्यात आले
सदर क्रिडा स्पर्धेसाठी गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्याकडून प्रथम पुरस्कार ३३,३३३.
युवा नेते कुमार अवधेशराव बाबा आत्राम यांच्याकडून २२,२२२
प्रशांतभाऊ आत्राम उपसरपंच तोडसा यांच्याकडून तृतीय पुरस्कार ११,१११ देण्यात येणार आहे


यावेळी उदघाटनीय भाषणात राजे साहेब म्हणाले की एटापल्ली सारख्या अतिदुर्गम भागात बॅडमिंटन स्पर्धा घेणे खरंच कौतुकास्पद आहे. भविष्यात अश्या स्पर्धेतून मोठे बॅडमिंटन प्लेयर तयार होतील. आणि आपल्या तळ गावाच, जिल्ह्याचा नावलौकिक नक्की करतील.मला केव्हाही हाक द्या मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन यावेळी असे प्रतिपादन केले.आणि स्पर्धेत भाग घेतलेल्या खेळाडूना विजय संपादन करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रशांत आत्राम उपसरपंच तोडसा ग्रामपंचायत, श्री.प्रमोदजी गादेवार, मा.डॉ.सुदर्शन राठोड (SDPO), मा.विजयानंद पाटील साहेब पोलीस निरीक्षक एटापल्ली, पुरुषोत्तम गादेवार, मणीकंठा गादेवार, राघवेंद्र सुलवावर, बाबुराव गंपावर, अशोक पुल्लूरवार, दीपक सोनटक्के, अनिकेत मामीडवार यांच्यासह गावातील गावकरी व युवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post