बेरोजगारीचं भयंकर चित्र; औरंगाबादेत पोलिस भरतीसाठी अर्ज भरणारे चक्क बीएचएमएस-एमडी अन् बी-टेकचे विद्यार्थी..


💁🏻‍♂️ औरंगाबाद शहर आणि ग्रामीण पोलीस दलासाठी भरती प्रकिया सध्या सुरु आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर तरुणांनी अर्ज दाखल केली आहे. औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलात एकूण 39 जागा भरल्या जाणार असून, यासाठी 5 हजार 725 अर्ज आले आहेत. विशेष म्हणजे यांत बीएचएमएस -एमडी, एमई, बीई, एलएल. एम.,एलएल. बी.,एमबीए, एमएस्सी, फार्मा पदवीधरकांसह तब्बल 1 हजार 661 उच्चशिक्षित तरुणांनी पोलीस भरतीसाठी अर्ज दाखल केले आहे. त्यामुळे यातून उच्चशिक्षितांची महाराष्ट्रातील बेरोजगारीचं चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे.


👮🏻‍♂️ राज्य शासनाने पोलिस भरती प्रक्रियेला सुरुवात केली आहे. 2 जानेवारीपासून उमेदवारांना कागदपत्रांची तपासणी, मैदानी चाचणीसाठी बोलावण्यात येत आहे. तीन दिवसांमध्ये 2100 उमेदवार बोलावले. त्यातील 1102 उमेदवार हजर राहिले. मैदानी चाचणीत 907 उमेदवार पात्र ठरले असून, 195 उमेदवार अपात्र ठरले.

😞 संपूर्ण भरती प्रक्रिया पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्या मार्गदर्शनात सुरू असून त्यासाठी अपर पोलिस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्यासह 6 उपविभागीय अधिकारी, 10 पोलिस निरीक्षक, 9 सहायक निरीक्षक, 17 उपनिरीक्षक आणि 135 अंमलदार तैनात केले आहेत. त्याशिवाय 18 व्हिडीओग्राफर कार्यरत असून, जिल्हा पोलिस मैदानावर सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे.. 

▪️ *एका जागेसाठी 157 उमेदवार* 
ग्रामीण पोलिसांमधील 39 जागांपैकी 27 पुरुषांसाठी, तर 12 जागा महिलांसाठी उपलब्ध असणार आहे. त्यामुळे पुरुषांच्या एका जागेसाठी 157 उमेदवार असतील, तर त्याचवेळी महिलांच्या एका जागेसाठी 125 उमेदवार असणार आहेत. त्यामुळे अतिशय जीवघेणी स्पर्धा पोलिस भरतीमध्ये असल्याचेही आकडेवारीवरून स्पष्ट झाले.


Post a Comment

Previous Post Next Post