वाहनाच्या धडकेत जगदीश बडोले ठार


भंडारा : भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने पायी जात असलेल्या जगदीश बडोले (70) यांना धडक दिली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर सेंदूरवाफाजवळ झाला. अपघातानंतर चालकाने वाहनासह घटनास्थळावरून पळ काढला. याबाबत पोलीस उपनिरीक्षक धीरज खोब्रागडे यांच्या फिर्यादीवरून साकोली पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Post a Comment

Previous Post Next Post