ग्रामसेवक नरेश घुटके व गटविकासअधिकारी टिचूकले धानोरा यांच्यावर कारवाई करा- संगिता विजयकर


प्रती,
मा.मुख्यकार्यकारीअधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली.
यांचे सेवेसी


तक्रार - ग्रामसेवक नरेश घुटके व गटविकासअधिकारी टिचूकले धानोरा.यांच्यावर कारवाई करन्या बाबत.
तक्रारदार :- संगिता विजयकर म.शासन अधिस्वीकृत पत्रकार. जिल्हा गडचिरोली

महोदय,
सविनय विनंती या प्रमाणे आहे कि, मी दिनांक २९/१२/२०२२ ला धानोरा तालुक्यातील,व पंचायत समिती धानोराअंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत कार्यालय सालेभट्टी येथे दिनांक 29/12/2022 ला प्रत्यक्षात भेट दिली असता, सदर ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक नरेश घुटके गैरहजर असल्याचे आढळून आले . ग्रामसेवक घुटके सतत कार्यालयात गैरहजर राहत असल्याच्या अनेक तक्रारी असताना.हि बाब धानोरा गटविकास अधिकारी टिचुकले यांच्या निदर्शनास आणून दिली असताना सुद्धा त्यांनी घुटके यांच्यावर कुठचील कारवाई न करता ग्रामसेवक नरेश घुटके यांच्या .९४२०९६३२२६ या भ्रमणध्वनी वरून फोन करून तुला आम्ही बघुन घेवु अशी धमकी सुद्धा दिली. माझ्या जिवीतास काही बरे वाईट झाल्यास ग्रामसेवक नरेश घुटके व गटविकास अधिकारी टिचुकले यांनाचं जबाबदा धरण्यात येईल.ग्रामसेवक घुटके व गट विकास अधिकारी यांच्यावर त्वरित कार्यवाही करून व त्यांना त्वरित हटवून या दोघांची बदली सिरोंचा, भामरागड येथे करण्यात यावी यांच्यावर कार्यवाही न केल्यास मला माझ्या मार्गानी जावे लागेल.

दिनांक:- ३०/१२/२०२२

Post a Comment

Previous Post Next Post