*संघारामगिरीत अवतरणार तथागतांचे शांतीदूत*




चिमूर / तालुका प्रतिनिधी 

       खडसंगी जवळील संघारामगिरी येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुध्दा भव्य धम्म समारंभ मेळावा कार्यक्रम आयोजीत करण्यात आलेला आहे. सदर कार्यक्रम ३० व ३१ जानेवारी 2023 ला दोन दिवशीय असून,  कार्यक्रमाला तथागतांच्या संघारामगिरी मोठ्या संख्येच्या उपस्थितीने निळाई ने फूलणार असून संघारामगिरीत तथागतांचे शांतीदूत अवतरणार आहेत.

     तपोवन बुद्ध विहार, महाप्रज्ञा, साधनाभुमी, संघारामगिरी, येथे  पिढयानपिढया डोळे असून आंधळा असणारा, कान असून बहिरा असणारा, तोंड असून मुका असणारा समाज, बोधीसत्व परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुकनायकी आंदोलनामुळे खळबडून जागा झाला आणि पिढयानपिढयांची गुलामी संपली, ३१ जानेवारी  १९२० ला मुकनायक हे मुखपत्र काढुन मुक्ती संग्राम लढविला आणि जिवना अखेर भगवान बुद्धाचा धम्म सर्वाना हितकारक आहे. हे जगाला पटवून दिले. धम्म आचरणातून सारं जीवनच बदलून जात. माणसापासून तुटलेल्या माणसाला जोडण्याचा हा ऐकमेव मार्ग आहे. शोषण विरहीत, दुःख विरहीत समाजाची पुर्नरचना चित्त शुद्धीच्या विशुद्धी मार्गाने शक्य आहे. तो मार्ग समजुन घेवून अनुभव करण्यासाठी श्रद्धेने आपण धम्मश्रण आहे. शोषण विरहीत. दुःख विरहीत समाजाची करण्यासाठी दरवर्षी भव्य धम्म समारंभ कार्यक्रम संघारामगिरी येथे बौद्ध धर्म गुरूंच्या व लाखो बौध्द अनुयायांच्या उपस्थितीत घेतला जातो.

     भव्य धम्म समारंभ कार्यक्रम ३० जानेवारी 2023 ला सकाळी १० वाजता ध्वजारोहन, शीलग्रहण, भीक्खू संघाचे भोजनदान, दुपारी १ ते ५ पर्यंत प्रवचन, सायंकाळी ६ ते ८ वाजता बौध्द रंगभूमी नागपूर तर्फे मुक्तनाट्य होणार आहे रात्री ८ ते २ पर्यंत महपरीत्राणपाठ केले जाणार आहे. तर ३१ जानेवारी २०२३ ला पहाटे ५ ते ६ :३० वाजता ध्यान साधना व मंगलमैत्री, सकाळी ९ ते ११ वाजता प्रवचन क्रांती - प्रतीक्रांती, सकाळी ११ वाजता भोजनदान आणि भीक्खु संघास चिवर व अष्टपरीस्कार दान, दुपारी १ ते ३ वाजता प्रमुख पाहुणे यांचे भाषण, दुपारी ३ वाजता कार्यक्रमाचे अध्यक्ष  यांचे प्रवचन, दुपारी ४ वाजता मंगलमैत्री व कार्यक्रमाचा समारोप होणार आहे.

       सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पूज्य भदंत शिलानंद महास्थविर तपोभुमी आंबोडा, हे राहणार आहेत. प्रमुख अतिथी अखिल भारतीय भीक्खु संघ भारत, हे राहणार आहेत कार्यक्रमाचे संचालक म्हणून भिक्खू ज्ञानज्योती महास्थविर ताडोबा अभयारण्य संघनायक संघारामगिरी हे उपस्थित राहणार आहेत.  तर प्रमुख पाहुणे म्हणून बाळू धानोरकर खासदार चंद्रपूर, प्रतिभाताई धानोरकर आमदार वरोरा क्षेत्र, किर्तिकूमार भांगडिया आमदार चिमूर क्षेत्र, प्राध्यापक जोगेंद्र कवाडे माजी खासदार, सुलेखाताई कुंभारे माजी राज्यमंत्री, राजू गायकवाड माजी सभापती, सतीश वारजूरकर माजी अध्यक्ष जिल्हा परिषद चंद्रपूर, सतीश पेंदाम बिरसा ब्रिगेड राष्ट्रीय संघटक, रवी कांबळे बौध्द साहित्य अभ्यासक, वर्षाताई श्यामकुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महासचिव महाराष्ट्र प्रदेश इत्यादी मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post