पक्षाचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांलाच आगामी काळात चांगली संधी देणार. जिल्हाध्यक्ष महेंद्र बाम्हनवाडे यांचे प्रतिपादन








आरमोरी - जुन्या काळापासून काम करीत असणाऱ्या अनेक पदाधिकाऱ्यांना महत्त्वाची पदे आणि विविध ठिकाणच्या उमेदवारा देऊन नेहमी त्यांना पक्षाने मान सन्मान मिळवून दिलेले आहे परंतु काही नेते कार्यकर्ते आज रस्त्यावर उतरून काम करताना दिसत नाही काँग्रेसचे युवा नेते खासदार राहुलजी गांधी यांच्या अनेक विधानातून  सांगितले की आम्ही पक्षासाठी काय केलो हे सांगण्यापेक्षा आज वास्तव्यात काय करीत आहोत यावर जास्त भर दिला पाहिजे आणि जनतेसाठी रस्त्यावर उतरून जनतेची कामे करावी व पक्ष संघटन मजबूत करावा याच धरतीवर सध्याच्या घडीत आज  काँग्रेस पक्षाच्या वाईट दिवसात ताकतीने पक्षासाठी कार्यकर्ते लढत आहे त्याच कार्यकर्त्यांना आगामी काँग्रेसच्या चांगल्या दिवसात संधी मिळेल
 त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून त्यांच्या कार्याला बळ व न्याय मिळवून देण्याचा काम करणार असे प्रतिपादन गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र बाम्हणवाडे यांनी केले.

आरमोरी येथील बाजार समिती च्या राजीव भवनात तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने दिनांक काल झालेल्या हाच से हात जोडो अभियानाच्या  प्रभावीपणे राबविण्यासाठी आढावा बैठकीत गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे हे  अध्यक्षिय स्थानावरुण बोलत होते. 
या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार आनंदराव गेडाम, विशेष अतिथी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव तथा  गडचिरोली जिल्हा प्रभारी डॉ. नामदेव किरसान, प्रदेश सचिव डॉ. नितीन कोडवते, किसान काँग्रेस जिल्हाध्यक्ष वामनराव सावसाकडे   महिला काँग्रेस सरचिटणीस चद्राताई कोलते       
काँग्रेस कमिटीचे अनुसुचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष रजनिकात मोटघरे गडचिरोली जिल्हा अनुसूचित जाती महिला काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षा वृदाताई गजभिये माजी जिल्हा परिषद सदस्य मनिषाताई दोनाडकर नगरसेविका दुगाताई लोनारे नगरसेवक उषाबाई बारसागडे नगरसेवका किती पत्रे जिल्हा महासचिव रोषणीताई बैस तालुका महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा मंगलाताई कोवे  जेष्ठ नेते मधुकर दोनाडकर माजी सभापती  विनोद बावनकर माजी पंचायत समिती सदस्या किरणताई मस्के  रामभाऊ हस्तक  शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष अंकुश  गाढवे जिल्हा उपाध्यक्ष नंदू नरोटे अनिल किरमे भिमराव बारसागडे संजय   लोनारे माजी पंचायत समिती सदस्य  अल्काताई उदिरवाडे मनोज ढोरे पिंकूजी बावणे दिवाकर पोटफोडे भुपेश कोलते निलकंठ गोहणे  अतुल आकरे मुखरु देशमुख योजना रामटेके रामटेके विश्वेश्वर दरो नरेंद्र टेभुणे राहुल धाईत सत्यवान वाघाडे दिगाबर धाईत स्वनिल ताडाम तुकाराम वैरकर अरविंद फटाले
या कायक्रमाचे प्रस्ताविक तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नगरसेवक मिलिंद खोब्रागडे यांनी केले तर संचालन शहर काँग्रेस चे अध्यक्ष शालिक पत्रे यांनी केले तर आभार प्रदर्शन गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post