शिक्षकाच्या पत्नीची विष घेऊन आत्महत्या




 कोरची :- येथील शासकीय  आश्रमशाळेसमोर राहत असलेल्या एका शिक्षकाच्या पत्नीने घरी कोणी नसताना कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना दुपारी ३ वाजता घडली. देवकी अमरदीप रंगारी (३०) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.


देवकी ही घरात बेशुद्ध अवस्थेत आढळली, तिच्या तोंडातून फेस येत होता. त्यामुळे तिने कीटकनाशक घेतल्याचे लक्षात येताच पती अमरदीप रंगारी यांनी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले; परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

मृत महिला मनोरुग्ण असून, तिच्यावर उपचार सुरू होते, असे तिच्या पतीने पोलिसांना बयाणात सांगितले. कोचीनारा घाटावर तिच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.

मृत महिलेला दोन मुली व पती आहे. कोरची पोलिसांनी मर्ग दाखल केला असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत.


Post a Comment

Previous Post Next Post