थेट ट्रॅक्टर अंगावर घालून आपल्या पत्नीची केली हत्या

 : जालना:-  जिल्ह्यातून एक भयानक घटना समोर आली आहे. एकाने थेट ट्रॅक्टर अंगावर घालून आपल्या पत्नीची हत्या केली.
जालना जिल्ह्यातल्या कुंभारी शिवारात ही धक्कादायक घटना घडली. कविता गजानन आव्हाड, असे मृत पत्नीचे नाव आहे. तर गजानन रघुनाथ आढाव असे आरोपी पतीचे नाव आहे. याप्रकरणी हसनाबाद पोलीस ठाण्यात पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रॅक्टर अंगावर घालून पतीनेच पत्नीची हत्या केल्याची घटना जालना जिल्ह्यातल्या कुंभारी शिवारात घडली. कविता गजानन आव्हाड, असे मृत पत्नीचं नाव आहे. मृत महिलेचा वर्षभरापूर्वी आरोपी गजानन रघुनाथ आढाव याच्याशी विवाह झाला होता. मागच्या काही दिवसांपासून दोघांमध्ये सतत भांडणं होत होती. याविषयी पती गजानन विरोधात हर्सुल पोलिसात तक्रार दाखल होती. त्यानंतर नातेवाईकांनी दोघांमध्ये मध्यस्थी करत भांडणं मिटवून दोघांमध्ये समन्वय घडवून आणला होता. त्यानंतर पती गजानन तिला सासरी घेवून गेला. मात्र, चार-पाच दिवसांपूर्वी कविता हिची सासू कौशल्या रघुनाथ आढाव हिच्यासह घरातील मंडळींनी घर विकत घेण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये घेवून ये, यासाठी तिचा छळ करत होते. नंतर पती गजानन याने तिचा खून केला. तसेच नंतर ट्रॅक्टर अंगावर घालून अपघाताचा बनाव केला. याप्रकरणी मृत कविता हिच्या भावाच्या फिर्यादीवरून आरोपी गजानन याच्याविरोधात हसनाबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत. हेही
आईच्या बॉयफ्रेंडच्या मुलासोबत अफेअर, प्रेमासाठी लेकीने असा रचला डाव -

तीन अल्पवयीन मुलांच्या आईचे अफजल बागवान यांच्याशी प्रेम संबंध होते. तर तीन अल्पवयीन मधील एका मुलीचे अफजल बागवान यांचा मुलगा सोहेल याच्याशी प्रेम संबंध होते. मात्र, अफजलला सोहेलचे आणि संबंधित अल्पवयीन मुलीचे प्रेम संबंध अमान्य होते. यातूनच प्रेयसीने आपला प्रियकर असणाऱ्या सोहेलच्या मदतीने त्याच्याच पित्याचा अर्थात अफजलचा काटा काढण्याचे ठरवले.

त्यांनी आखलेल्या कटानुसार, पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे अफजल बागवान यास घेऊन जात आधी त्याच्या डोळ्यात लाल तिखट टाकण्यात आले. यानंतर डोक्यावर दगड घालून पेट्रोल टाकून त्याला पेटवून देण्यात आले. यामध्ये अफजल बागवान याचा मृत्यू झाला आहे. या घटनेने पंढरपूर तालुक्यात एकच खळबळ उडाली. प्रेमासाठी चक्क मुलाने आपल्या बापानेच संपवले आहे. याबाबत पंढरपूर तालुका पोलीस अधिकचा तपास करीत आहेत. मृत अफजल बागवान यांचा मुलगा सोहेल यासह तीन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post