नोकरीच्या अमिषाने 34 वर्षीय विवाहितेवर वारंवार बलात्कार





पुणे :-  सातारा जिल्ह्यातील एकाने पुणे महानगरपालिकेत नोकरी मिळवून देण्याच्या आमिषाने एका 34 वर्षीय विवाहित महिलेवर वारंवार बलात्कार केला. तसेच तिची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचे फिर्यादीत पिडीत महिलेने म्हटले आहे. कोथरूड पोलीस ठाण्यात याप्रकरणी संतोष दत्तात्रय पवार (रा. मेढा, ता. जावळी, जि. सातारा) याच्याविरुद्ध बलात्कार आणि अनैसर्गिक संबंध केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, पिडित महिलेच्या घरामध्ये काही अंतर्गत वाद सुरू असल्याचा आरोपीने गैरफायदा घेवून जवळीत साधली. आरोपीने फिर्यादीला पुणे महानगरपालिकेत नोकरी लावतो, असे सांगून 8 लाख 68 हजार रुपये रोख रक्कम तिच्याकडून घेतले. दरम्यान, फिर्यादीच्या असहायतेचा आणि घरी झालेल्या वादाचा गैरफायदा आरोपीने घेतला. तिला लग्नाचे आमिष दाखवून डेक्कन पवेलियन हॉटेल या ठिकाणी बोलावून घेत तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले.

पिडीतेबाबतचा हा सर्व प्रकार 2019 ते 2021 या सर्व कालावधीत घडत होता. आरोपीने या कालावधीत फिर्यादीला नोकरी न लावता तसेच तिच्यासोबत लग्न न करता तिची आर्थिक फसवणूक केली. कोथरूड पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Post a Comment

Previous Post Next Post