युवारंग तर्फे राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी.*



*युवारंग संत महापुरुषांच्या विचारांचा वारसा जपणारे संघटन :- राहुल जुआरे ,अध्यक्ष युवारंग*




उराडी :- नेहमी सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्य, उद्योग, कृषी, महिला सशक्तिकरण व सामाजिक क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रम घेऊन अग्रेसर असणाऱ्या युवारंग तर्फे आज दिनांक १२ जानेवारी २०२३ ला सकाळी ठीक ११:०० वाजता राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून उराडी येथील श्री. छत्रपती शिवाजी चौकातील भव्यदिव्य सिंहासनावर आरूढ असलेल्या श्री. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला माल्याअर्पण करून कुथे पाटील विद्यालय ,उराडी येथे राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली




याप्रसंगी या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून युवारंग चे संस्थापक तथा अध्यक्ष मा.राहुलजी जुवारे तर प्रमुख अतिथी म्हणून स्वय रक्तदाता गडचिरोली जिल्हा समितीचे अध्यक्ष मा. चारुदत्तजी राऊत सर , युवारंगचे उपाध्यक्ष मा. मनोजजी गेडाम, राजमाता जिजाऊ शक्ती कराटे ग्रुप आरमोरी चे संयोजक मा.रोहितजी बावनकर, कुथे पाटील विद्यालय ,उराडी चे प्राचार्य मा.पुसतोडे सर, उराडी गावचे उपसरपंच मा. राधेश्यामजी दडमल, कुथे पाटील विद्यालय उराडी चे शिक्षक मा. झाडे सर मा.जनबंधु सर मा.ठाकरे सर उपस्थित होते राष्ट्रीय युवा दिनाच्या प्रसंगी अध्यक्षस्थानी मार्गदर्शन करताना युवारंग चे अध्यक्ष मा.राहुल जुवारे यांनी विद्यार्थ्यांनी महापुरुषांचे विचार आत्मसात करून जीवनात प्रगती करावी व आपल्या जीवनाला सुखमय व प्रगतिशील बनवून समाजातील वंचित ,शोषित घटकांना मदतीचा हात देत प्रगतीच्या प्रवाहात आणण्याचे प्रयत्न करावे असे आवाहन केले याप्रसंगी कुथे पाटील विद्यालयातील विद्यार्थी व पालक बहुसंख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे संचालन ठाकरे सर यांनी केले तर आभार साहिल वैरागडे यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post