प्रज्ञासिंह ठाकूरला संसद सदस्य राहण्याचा नैतिक अधिकार नाही ‘प्रक्षोभक व द्वेषपूर्ण भाषणा’वर १०० हून अधिक माजी नोकरशहांचे खुले पत्र, लोकसभा अध्यक्षांकडे कारवाईची मागणी

प्रज्ञासिंह ठाकूरला संसद सदस्य राहण्याचा नैतिक अधिकार नाही


‘प्रक्षोभक व द्वेषपूर्ण भाषणा’वर १०० हून अधिक माजी नोकरशहांचे खुले पत्र, लोकसभा अध्यक्षांकडे कारवाईची मागणी

भोपाळमधील भाजपा खासदार प्रज्ञासिंह ठाकूरच्या प्रक्षोभक व द्वेषपूर्ण भाषण प्रकरणी देशातील १०० हून अधिक माजी नोकरशहांनी लोकसभा अध्यक्षांकडे कारवाईची मागणी केली आहे. माजी नोकरशहांनी दावा केला की ठाकूर यांनी कर्नाटकात केलेले भाषण ‘गैर-हिंदू समुदायांविरुद्ध द्वेष पसरवणारे’ होते. एका खुल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की ठाकूर यांनी वारंवार केलेल्या प्रक्षोभक भाषणांमुळे आणि द्वेष पसरवल्यामुळे त्यांचा खासदार होण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे.



या पत्रात म्हटले आहे की, देशासाठी कायदे करणार्‍या संसदेच्या सभागृहांवर विशेष जबाबदारी असते. निश्चितपणे याच्या सदस्यांना घटनेच्या तत्त्वांचे उल्लंघन करण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. म्हणून आम्ही लोकसभेच्या अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी हे प्रकरण योग्य कारवाईसाठी लोकसभेच्या आचार समितीकडे पाठवावे. 



यापूर्वी २५ डिसेंबर रोजी, कर्नाटकच्या शिवमोग्गा जिल्ह्यात हिंदू जागरण वेदिकेच्या दक्षिणेकडील प्रादेशिक युनिटच्या वार्षिक अधिवेशनाला संबोधित करताना, ठाकूर यांनी आमच्या घरात घुसखोरी करणार्‍यांना चोख प्रत्युत्तर देण्याचे सांगितले होते. हिंदूंना त्यांच्यावर आणि त्यांच्या प्रतिष्ठेवर हल्ले करणार्‍यांना उत्तर देण्याचा अधिकार आहे. या पत्रावर १०३ स्वाक्षरी करणार्‍यांमध्ये दिल्लीचे माजी उपराज्यपाल नजीब जंग, माजी परराष्ट्र सचिव शिवशंकर मेनन, माजी भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) अधिकारी ए.एस. दुलत, ज्युलिओ रिबेरो आणि अमिताभ माथूर आणि माजी भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) अधिकारी टी.के.ए. नायर आणि के. सुजाता राव यांचा समावेश आहे..

Post a Comment

Previous Post Next Post