आरमोरीत जयंती दिनी क्रांतिज्योतीना अभिवादन*

*आरमोरीत जयंती दिनी क्रांतिज्योतीना अभिवादन*


आरमोरी... देशात महिलासाठी शिक्षणाचे दालन उभी करणारी पहिली महिला शिक्षिका ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त समता युवा सामाजिक संघटनेच्या वतीने मंगळवारी सायंकाळी भगतसिंग चौकात अभिवादन कार्यक्रम करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्क्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या सौ. शालिनीताई गेडाम या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून माजी जिल्हा परिषद सभापती 
सौ. वेणूताई ढवगाये,तालुका महिला आयोगाच्या सौ. मंजुषा दोनाडकर . माजी.ग्राम पंचायत सदस्य सौ. मेघा मने,प्रा.सौ स्नेहा मोहुरले,अँड, अमित टेम्भुरने, प्रा.अमरदिप मेश्राम, महेंद्र रामटेके, समता युवा सामाजिक संघटनेचे अध्यक्ष निलेश अंबादे, 
आदी उपस्थित होते.

क्रांतीज्योती सावत्रीमाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून वंदन करण्यात आले. क्रातीज्योती सावित्रीबाई फुले यांची प्रेरणा घेऊन विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवावा व समाजात महिलेवर होणाऱ्या अन्याय्य अत्याचार विरोधात क्रांतीची ज्योत प्रज्वलित ठेऊन आवाज उठवावा असे मत महिला वक्त्यानी व्यक्त केले.

कार्यक्रमाला समता युवा सामाजिक संघटनेचे सचिव अनुप रामटेके सहसचिव मंगेश पाटील निखिल दुमाणे, पराग वागळे , निशांत वनमाळी, भूषण काळबांडे,सौरभ मस्के, रुपेश जवंजाळकर,, आदित्य सोनटक्के, मयूर सोमनकर, अमोल टेम्भुरने ,भूपेश वाकडे, प्राधान्य ठेंभूर्णे ,बादल बांभोले,आदित्य चीलबुले , हरपल ढवळे सह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post