कलेक्टर चुकीच्या ठिकाणी चक्कर मारत आहेत



जळगाव शहरातील रस्ते मागील दहा वर्षात बनवले नाहीत.जिल्हाधिकारी , आयुक्त सुद्धा येथील पालकमंत्रीच्या पंक्तीत जेवले.तर कोणी काय खाल्ले? कोणी किती खाल्ले?हे कोणीच सांगत नाहीत.ते आपणच शोधून काढले पाहिजे.जिल्हाधिकारी जर पालकमंत्रीच्या खिशात बसून कलेक्टोरोट चालवत असतील तर असेच होणार.जे झाले आहे.म्हणून कलेक्टर अभिजित राऊत समक्ष भेटून सांगितले होते कि, साहेब, पालकमंत्री चे पद गेले कि ते दारू विकतील.रेतीचा धंदा करतील.हाणामारी करतील.नाचगाणे करतील.पण तुम्ही तर युपीएससी अधिकारी आहात.तरुण आहात . अजून तीस वर्षे नोकरी करायची आहे.जर तुमची नोकरी गेली तर काय करणारं? तुम्हाला बाहेर तोंड काढता येणार नाही.अडकले तर कोणीही ऐकून घेणार नाही.म्हणून तुम्ही पालकमंत्री ने केलेल्या अपहाराची, भ्रष्टाचाराची तक्रार नोंदवा.तुम्ही नाही नोंदवली तरी ती नोंदवली जाणारच आहे.पण तुम्ही माफीचे साक्षीदार झाले तर अधिक चांगले.आमचे काम सोपे.पोलिसाचे काम सोपे.कोर्टाचे काम सोपे.
    आता जळगाव ला नवीन दमाचे कलेक्टर आले आहेत.अमन मित्तल साहेब.हे रस्ते पाहणीचा कार्यक्रम करीत आहेत.पण कुठे?जेथे गडबड आहे तेथे कि,जेथे गडबड नाही तेथे? साहेबांनी गडबडीचे,अपहाराचे, भ्रष्टाचाराचे रस्ते पाहिलेच नाहीत.त्यांना मुद्दाम चुकीचे ठिकाणी फिरवले जाते.फोटो काढले जातात.पेपरला बातमी येते.आणि शहर अभियंता, आयुक्त, आमदार, पालकमंत्री निश्चिंत झोपतात.बला टळली आपली.
     आम्ही कलेक्टर अमन मित्तल साहेबांना विनंती करतो कि , साहेब तुम्ही चोरांना घेऊन चोरी पकडू शकत नाहीत.ते गुमराह करीत आहेत.आम्ही नागरिक ,ज्यांच्या घरात चोरी झाली ते सांगतील,काय चोरले?किती चोरले?कोणी चोरले? 
     मित्तल साहेब,झेडपी समोर रस्ता खोदून पडला आहे.सहा महिने झाले.लोकांना त्रास होतो.पण सीईओ आणि तहसीलदार यांना काहीच कसे दिसत नाही? जा बघा,तो रस्ता.असा कुरूक्षेत्रावर निपचित पडलेल्या भिष्माचार्यासारखा का पडला आहे?कोणी अर्जून आहे कि नाही पाणी पाजायला?साहेब,या जळगाव मधील राजकीय चोरांनी एकाच ठेकेदाराला ढोमणाभर ठेके दिले आहेत.इतर ठेकेदारांना डावलून.का?म्हणे,हे आमचे ऐकून घेत नाहीत.हे आमचा हिस्सा देत नाहीत.
      मित्तल साहेब, जळगाव शहरातील प्रभाग १२ मधे अनुराग स्टेट बँक कॉलनी आणि विवेकानंद नगरच्या शिव रस्त्यावर ९६ लाखाचा ठेका कोणी सूरज नारखेडेला दिला.म्हणे तो राष्ट्रवादी चा माणूस आहे म्हणून महाआघाडी सरकार मधील चोर मंत्री ने दिला.कमी सिमेंटचा रस्ता बनवला.मनपाचा संबंधित अभियंता संजय नारखेडे यांनी मोजमाप पुस्तक भरून दिले.मनपा अभियंता नरेंद्र जावळे यांनी गुणवत्ता प्रमाणपत्र दिले.आणि आयुक्त सतीष कुलकर्णी यांनी पेमेंट दिले.तो रस्ता फक्त सहा महिन्यांत उखडून बरबाद झाला.तर असे कसे मोजमाप?अशी कशी गुणवत्ता? आणि पैसा कुलकर्णीच्या पगारातून तर दिला नसेल?असे आयुक्त,असे अभियंता येतात, लुटून जातात.तर आपण तेथे जाऊन पाहणी केली पाहिजे.पण मनपा अभियंता तुम्हाला तेथे जाऊ देणार नाही.नगरसेवक तेथे बोलणार नाहीत.सर्वांनी आपला वाटा हिस्सा हजम केला आहे.सर,चोरी येथे आहे.तर फौजदारी येथेच झाली पाहिजे.
     मित्तल साहेब, कोर्ट ते गणेश कॉलनी रस्ता दोन वर्षात काम सुरू केले.का? आम्ही नागरिक बोंबा मारली तेंव्हा?तरीही रस्ता कसा बनवायचा,किती बनवायचा,कोणी बनवायचा असे कोणतेही बोर्ड लावले नाही.का? लोकांना कळूच द्यायचे नाही कि , नक्की काय चालले आहे?आणि रस्ता बनवला तर श्रेय उपटण्यासाठी आमदार, पालकमंत्री, मंत्री, मुख्यमंत्री यांच्या नावाचे बोर्ड लावले आहे.ते चुकीचे आहे.काय योगदान आहे या लोकांचे? जर रस्ता बनवण्याचे श्रेय घ्यायचे असेल तर रस्ता लवकर न बनवण्याचे पाप यांनीच केले आहे.या लोकांचे नांव वाचून नागरिकांना चीड येते.शिवी हासडतात यांना.ते बोर्ड काढून टाकले पाहिजे.तेथे रस्त्यांची माहिती बाबत बोर्ड लावला गेला पाहिजे. सर,तेथे चोरी झाली आहे.फौजदारी सुद्धा तेथेच झाली पाहिजे.
     मित्तल साहेब, कलेक्टर बंगला तर आपल्या पायाखाली आहेच.तर मग फक्त गिरणा टाकी पर्यंत तरी फेरफटका मारा. तेथे कोण रस्ता बनवतो,किती बनवतो,कितीचा बनवतो,कसा बनवतो,असे काहीच जाहीर होत नाही.अंधेरी नगरी चौपट राजा.सर,लोकांची तक्रार तेथे आहे.तर फौजदारी तेथेच झाली पाहिजे.
      रस्ता बनवण्यासाठी डिझाईन सिस्टीम आहे.नवीन काहीच करायची गरज नाही.पण जी सिस्टीम आहे ती तर पाळली पाहिजे.इस्टीमेट,टेंडर,वर्क ऑर्डर,सुपरव्हिजन,मेझरमेंट, क्वालिटी सर्टिफिकेट नंतर पेमेंट.पण असे काहीच होत नाही.झालेले नाही.हा सर्व कार्यक्रम बंद खोलीत होत आहे.कमीशन द्या आणि काम न करता पैसे उपटून घ्या.
     सर, आम्ही नागरिक अभियंता, आयुक्त आणि कलेक्टर पेक्षा जास्त बुद्धिमान नाहीत.पण प्रामाणिक नक्कीच आहोत.कारण आपण लोक दोन चार वर्षात जळगाव सोडून नांदेड, बारामती, कोल्हापूर निघून जाल.पण आम्हाला याच रस्त्यावरून चालायचे आहे,रामरथावर आरूढ होईपर्यंत.म्हणून आमचा आग्रह आहे कि,आपण नागरिकांच्या विनंती ला प्रतिसाद दिला पाहिजे.चोरांचे बोट धरून रस्ते पाहू नका.नागरिकांचे बोट रस्ते पहा.कारण रस्त्यांची गरज आम्हाला आहे.त्यासाठीच आम्ही कर दिला आहे.

.... शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच.
जळगाव.

Post a Comment

Previous Post Next Post