लोहारा जवळील मुख्य रस्त्यावर दुचाकी वाहनधारकाने केला तरुणाचा अपघात




अपघातग्रस्त तरुण हा गंभीर दुखापत असल्याने ब्रह्मपुरी येथील हॉस्पिटलमध्ये ICU मध्ये दाखल ..........


दिनेश बनकर कार्यकारी संपादक सुपर फास्ट बातमी
गडचिरोली 7822082216
 

लोहारा :-  मिळालेल्या माहितीनुसार साहिल रमेश ढाक मुक्काम बुट्टेबोरी तहसील हिंगणा जिल्हा नागपूर हा आपल्या मामाच्या गावी मुक्काम लोहारा तालुका आरमोरी जिल्हा गडचिरोली येथे भेटण्याकरिता आला होता परंतु दिनांक 31 =12= 2022 ला रात्रीच्या आठ वाजेच्या सुमारास जेवण करून तो घराबाहेर फिरण्याकरिता निघाला असता साहिल ढाक याला फोन आला साहिल ढाकणे फोन उचलून मुख्य रस्त्याच्या कडेला जाऊन फोनवरती बोलत असताना वैरागड लोहारा मार्गावरती जिल्हा परिषद श्याळेच्या जवळील मुख्य रस्त्यावर समोरून येत असलेल्या एम एच33x 8477 या दुचाकी वाहन धारकाने साहिल ढाक यांना जबरदस्त धडक दिल्याने साहिल ढाक हा गंभीर जखमी झााला. 


व्हिडियो
👇👇👇👇👇👇



त्याला लागलीच गावातील सुज्ञ नागरिकांनी उपचाराकरिता ब्रह्मपुरी येथे नेले परंतु साहिल ढाक याच्या प्रकृतीला गंभीर धोका असल्याने त्याला  ICU मधे दाखल करण्यात आले असल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे अजून पर्यंत या अपघात ग्रस्त प्रकरणाचे आरमोरी येथील पोलिस ठाण्यात तक्रार नसल्याचे समजते लोहारा येथील सुज्ञ नागरिकांनी त्या अपघातग्रस्त दुचाकी वांहन धारकावर कठोर कारवाई करावी अशी अशी मागणी जोर धरू लागल्याचे समजते .

Post a Comment

Previous Post Next Post