महसूल विभागाच्या लाचखोर धोरणामुळे राशन दुकानदार आता थेट ग्राहकांसोबत करतो काळाबाजार


बीड (प्रतिनिधी) गोरगरिबांच्या तोंडातले धान्य सर्रासपणे काळ्या बाजारात जात असल्याच्या अनेक घटना घडत असताना केवळ महसूल विभागाच्या लाचखोर धोरणामुळे राशन दुकानदार आता थेट ग्राहकांसोबत काळाबाजार करायला भीत नसल्याचे उघड होत असून आज ढेकणमोहा येथील राशन दुकानावर काहींना दोन-पाच किलोने धान्य वाटप होते तर काहींना ज्यादा पैसे दिल्यानंतर पोतं आणि कट्ट्याने धान्य दिले जात असल्याचा व्हिडिओ हातीलागला आहे. व्हिडिओमध्ये 'इथं माहिती होऊ द्या, तिकडं माहित होऊ देऊ नका' असे स्पष्टपणे म्हटल्याचे दिसून येते. या प्रकरणी संबंधित दुकानदारावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

बीड तालुक्यातील ढेकणमोहा या ठिकाणी पवार नामक व्यक्तीकडे राशन दुकान आहे. आज सकाळपासून राशनचे वाटप सुरू आहे. उपस्थित ग्राहकांना दोन- पाच किलोने धान्य दिले जाते. तर ज्यादा पैसे दिल्यानंतर काहींना पोतं आणि कट्ट्याने धान्य वाटप होत असल्याचे संबंधित व्हिडिओत पहावयास मिळत आहे. धान्य देणारा व्यक्ती हे कुठे माहित होऊ देऊ नका, असे म्हणतो तेव्ह कट्ट्याने धान्य घेणारा व्यक्ती इथे तर सर्वांनाच माहित झाले आहे ना', असे म्हणतो तेव्हा धान्य वाटप करणारा व्यक्ती "इथं माहिती होऊ द्या, तिकडं माहित होऊ देऊ नका” असं म्हणतो. यावरून राशन दुकानातला काळाबाजार समोर आला आहे. या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post