नकली MBBS डॉक्टरच्या हातून अनेकांचा गेला जीव

सावंतवाडी शहरातील आजपर्यंतच्या कार्यकाळात अनेक सामाजिक कार्यकर्ते मंत्री पदावर विराजमान झाले.परंतु सर्व सुविधांनी उपयुक्त अस रुग्णालय आज पर्यंत उभारण्यात आलेली नाही,तरीही शहरातील नामांकित डॉक्टर्सनी आज पर्यंत येथील जनतेला अतिशय उत्कृष्ट रुग्णसेवा दिली आहे तसेच औषधोपचारांची सुरळीत सेवाहीं स्थानिक मेडिकल स्टोअर मधून उपलब्ध असताना ही शहरातील एका मुन्नाभाई एम बी.बी.एस. च्याच हातून रुग्णाला इंजेक्शन दिलं गेल्यामुळे बरेच रुग्ण दगावल्याची चर्चा आज सावंतवाडी शहरातील परिसरात नागरिकांमधून होत आहे.

पूर्वीचे मोठे नाव असल्याने शहरातील रुग्ण या मुन्नाभाई कडे उपचारासाठी गेला असता त्याला इंजेक्शन देण्यातच रुग्णांची हालचाल मंदावते,आणि मग मात्र इतर कोणताही पर्याय नसल्याने गोवा येथील रुग्णालयात दाखल करावच लागत.परंतु २४ तासाच्या आत संबंधित रुग्ण दगावल्याचे निदर्शनास येत.अशा बऱ्याच घटना मुन्नाभाईच्या उपचारा दरम्यान आजू बाजूच्या परिसरात घडल्या आहेत. परंतु आज पर्यंत कोणीही आवाज उठवला नाही,कृपया स्थानिक नागरिकांनी या मुन्ना भाई एम. बी. बी. एस. च्या उपचार पद्धती बाबत सतर्क राहावे असे जाहीर आवाहन मानवाधिकार न्याय सुरक्षा संघटन तर्फे पत्रकार माध्यमातून करण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post