संस्कार पब्लिक स्कूल कुरखेडा येथे वार्षिक शालेय क्रीडा महोत्सव प्रसंगी बक्षीस वितरण कार्यक्रम



गडचिरोली :- विद्यार्थ्यांचे मानसिक विकासा सोबत शारीरिक विकास होणे आवश्यक असते आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचे मानसिक व शारीरिक विकास घडवून आणण्यासाठी शालेय क्रीडा महोत्सवच्या   माध्यमातुन विद्यार्थ्यांचे भवितव्य घडत असल्याचे प्रतिपादन प्रा. डॉ. पल्लवी तागडे यांनी केले ते
आदिवासी ग्रामीण विकास शिक्षण संस्था द्वारा संचालित संस्कार पब्लिक स्कूल & ज्युनिअर कॉलेज कुरखेडा येथे वार्षिक शालेय क्रीडा महोत्सवाचा बक्षीस वितरण सोहळा प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी कुरखेडा पोलीस स्टेशनचे  माने मॅडम, संस्कार पब्लिक स्कूलचे प्राचार्य देवेंद्र फाये, पत्रकार प्रा. विनोद नागपूरकर. पत्रकार महेंद्र लाडे, तसेच पालक वर्ग उपस्थित होते.
 सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्था सहसचिव प्रा. नागेश्वर फाये यांनी केले तर.संचालन निरंकारी मॅडम यांनी केले तर आभार छकुली दखणे या विद्यार्थ्यांनी मांनले.
 यावेळी विद्यार्थ्यांनी कराटे प्रदर्शित केले. यावेळी 
संस्कार स्पोर्ट मीट माध्यमातून संस्कार पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज कुरखेडा येथे 100 मीटर रनिंग रेस,रिले रेस,लॉंग जंप,चेस,कबड्डी ,खो-खो,बॅडमिंटन,
पोटॅटो रेस,सॅक रेस,स्पून अँड मार्बल,बॉल इन बास्केट,जंपिंग ऑन रोप इत्यादी. खेळ घेण्यात आले.
यावेळी मोठ्या संख्येत विद्यार्थ्यांनी क्रीडा स्पर्धेत सहभाग  घेवून प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवला त्या विद्यार्थ्यांचे मेडल व प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी पालक वर्ग मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post