आज जमा होणार पीएम किसान योजनेच्या 13व्या हप्त्याचे 2000 रुपये; जाणून घ्या वेळ.


💁🏻‍♂️ प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे.

🌈होळीपूर्वी पीएम किसान सन्मान योजनेच्या 13व्या हप्त्याची वाट पाहत असलेल्या शेतकरी आणि लाभार्थ्यांना सरकार भेटवस्तू देणार आहे. देशातील शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 13व्या हप्त्यासाठी अनेक दिवसांपासून वाट पाहत आहेत. मात्र, आता त्यांची प्रतीक्षा संपणार आहे. तिसर्‍या हप्त्याबाबत सरकारकडून एक मोठे अपडेट समोर येत आहे. या अंतर्गत, पीएम किसानच्या 13 व्या हप्त्यासाठी पैसे जारी करण्याची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आली आहे.

❓ *कधी होणार हप्ता जमा?*
पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 फेब्रुवारी 2023 रोजी देशात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 13 वा हप्ता जारी करणार आहेत. या दिवशी 13 व्या हप्त्यासाठी 2000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येणार आहेत. केंद्रीय कृषी राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली..

🛫पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या म्हणजेच 27 फेब्रुवारीला दुपारी 3:15 वाजता कर्नाटकातील बेलागावी येथे पोहोचतील, जिथे अनेक विकास उपक्रमांची पायाभरणी करण्यासोबतच पीएम किसानच्या 13व्या हप्त्याचेही विमोचन करतील. तिथेच PM मोदी 13व्या हप्त्याची रक्कम DBT द्वारे 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित करणार आहेत.

👨🏻‍🌾 *या शेतकऱ्यांना नाही मिळणार लाभ..*
सरकारने आधीच स्पष्ट केले आहे की, जर पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना 13 व्या हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल, तर तुमच्यासाठी *ई-केवायसी* करणे अनिवार्य आहे. त्यामुळे आजपर्यंत हे महत्त्वाचे काम केले नसेल, तर विलंब न लावता आजच पूर्ण करा. तुम्ही असे न केल्यास, तुम्ही पीएम किसान सन्मान निधीच्या 13 व्या हप्त्याचा लाभ घेण्यापासून वंचित राहू शकता.


Post a Comment

Previous Post Next Post