झेडपीची शाळा ५ मार्चपासून भरणार सकाळी ७.३० ते ११.३० या वेळेत; उन्हाळ्यामुळे घेण्यात आला निर्णय...*


🌞 जिल्हा परिषदेच्या शाळा ५ मार्चपासून सकाळच्या सत्रात भरणार आहेत. उन्हाचा तडाखा आता दिवसेंदिवस वाढू लागला असून दरवर्षीप्रमाणे यंदाही उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर, जिल्हा परिषदेच्या सर्वच शाळा सकाळी साडेसात ते साडेअकरा वाजेपर्यंत भरणार असून दूर अंतरावरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना उन्हाचा त्रास होऊ नये, या हेतूने हा निर्णय घेतला जातो.

🥵 उन्हाळ्यात उष्माघाताचा धोका असतो आणि उन्हामुळे अध्यापनाला देखील अडचणी निर्माण होतात. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुरवातीला १ मार्च ते ३० एप्रिल या दोन महिन्यांत शाळांची वेळ सकाळीच असते. यंदा १ मार्चऐवजी ५ मार्चपासून सकाळच्या सत्रात शाळा सुरु होणार आहेत. पण, प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना त्यासंबंधीची माहिती देतील. त्यानंतर तेच सोमवारी (ता. २७) त्यासंबंधीचा अंतिम निर्णय घेणार आहेत.

🎒 *नवे शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून*
ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून यंदा प्रथमच सर्व शिक्षकांच्या बदल्या ऑनलाइन पद्धतीने केल्या जात आहेत. परंतु, जून-जुलैमध्ये होणाऱ्या बदल्या फेब्रुवारी संपला तरीदेखील पूर्ण झालेल्या नाहीत. आता पुढील आठवड्यात त्यांच्या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण होईल, पण त्यांना नवीन शाळेवर कधीपासून रुजू व्हावे लागेल, हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. दरम्यान, आगामी शैक्षणिक वर्ष १५ जूनपासूनच सुरु होईल, असे शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

🙏🏻 

Post a Comment

Previous Post Next Post