महाविकास आघाडीने उडविला BJP चा धुव्वा


नागपूर :- विभाग शिक्षक मतदारसंघाच्या झालेल्या

निवडणुकीच्या मतमोजनीला आज सकाळी ८ वाजता नागपूर शहरातील अजनी रेल्वेचे समुदाय भवन येथे सुरुवात झाली. सुरूवातीलाच महाविकास आघाडीचे सुधाकर अडबाले यांनी प्रतिस्पर्धी भाजपाचे उमेदवार नागोराव गाणार यांचा पराभव केला.

पहिल्या फेरीच्या मतमोजणीत अडबाले यांना १४०७१ तर गाणार यांना ६३०९ मते मिळाली. एकूण ९ हजाराहून अधिक मतांनी अडबाले विजयी झाले आहेत. पहिल्या फेरीत मतांचा कोटा पूर्ण करीत विजयावर शिक्कामोर्तब केले. दहा वर्षापासून भाजपाकडे असलेली नागपूरची जागा महाविकास आघाडीने जिंकली भाजपाने गाणार यांची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती, फडणवीस, गडकरी यांनी त्यांच्यासाठी प्रचारसभा घेतल्या होत्या. दरम्यान, पहिल्या फेरीत अडबाले यांनी निर्णायक आघाडी घेतल्याने त्यांच्या समर्थकांनी जल्लोष सुरू केला.

Post a Comment

Previous Post Next Post