जगातील सर्वोत्तम राजा छत्रपती शिवाजी महाराज


जगातील सर्वोत्तम राजा छत्रपती शिवाजी,
-------------------------------------------------
संयमीपणा .
------------
उत्कृष्ट नेतृत्वाला , आदर्श राजाला , स्तितप्रज्ञ सेनापतीला शोभणारा महत्वाचा गुण म्हणजे संयमीपणा होय. संयमाने यथोचित कार्य साधता येते. हे शिवरायांना चांगले माहित होते. म्हणून ते बलाढ्य शत्रूसैन्याबरोबर झुंज देताना आपल्या कार्यातील संयम राखून होते.
शिवरायांनी सर्वात मोठा संयम पाळला तो पुरंदरच्या तहाच्या वेळी. शिवरायांनी त्यावेळी सारासार विचार केला होता. ' तहात गमावलेले किल्ले व प्रदेश , परत मिळविता येतील , पण युद्धात गमावलेले सैन्य , सहकारी सवंगडी परत मिळविता येणार नाहीत. ' म्हणून त्यांनी मिर्झाराजे जयसिंह बरोबर स्वराज्याचा तेजोभंग करणारा , पुरंदरचा तह घडवून आणला. शिवरायांनी तह घडवून आणण्याचा संयम पाळला नसता तर गमावलेली व खचलेली मने व मनगटे नव्या उत्साहाने पुन्हा उभी राहणे कठीण होते व भावी स्वराज्य निर्माण करणे कठीण पडले असते. ह्या तहाने स्वाभिमान दुरावलेला सेनापती नेताजी पालकर , पन्हाळगड याच्या एकत्रित मोहिमेवर वेळेवर हजर न राहिल्यामुळे शिवरायांच्या सैन्याला कच खावी लागली होती.
 आदिलशहाचा सिद्धी जौहर , इंग्रजांच्या ईस्ट इंडियाचा कंपनीचा अधिकारी हेन्री रेव्हिंगटन व सूर्यराव सुर्वेच्या मदतीने पन्हाळ्यला चार महिने वेढा घालून बसला होता. तर इकडे शाहिस्तेखान पुण्यात तळ ठोकून बसला होता. ह्या परिस्थितीत शिवरायांनी अक्रीतपणे चढाई करण्याचा संयम पाळला  होता. पन्हाळगडच्या वेढ्यात ते चार महिने संयमीपणे वागले व किल्ला टिकवून ठेवला आणि शेवटी यथोचित वेळ पाहून शत्रूवर प्रतीव्यक्तीचा  आभासाचा प्रयोग करून ते यशस्वी झाले. 
   शिवराय पोर्तुगीज , डच. इंग्रज इत्यादी पाश्चात्य व्यापाऱ्यानबरोबर प्र्शुब्धपणे युध्द करून त्यांचा सहसा बिमोड करीत नसत. इंग्रजानी सिद्धी जौहरला लांबपल्ल्याच्या तोफाचा पुरवठा करून त्याला मदत केल्यामुळे त्यांची राजापूर येथील वखार खणून काढली; पणह्या व्यापाऱ्यानचा  स्वराज्याच्या आर्थिक विकासासाठी उपयोग होणार आहे हे जाणून शिवरायांनी ह्या व्यापार्यांना फक्त ख्यात ठेवून त्यांच्याशी व्यापार संबंध ठेवले . 
   आदर्श नेत्याला तथा अष्टपैलू नेत्याला त्याच्या राज्यव्यवहारात व प्रजेत साम , दम, दंड, भेद ह्या तत्वांचा वापर करावा लागतो. तथापि त्याचे प्रमाण कसे व किती असावे याबाबतचा संयम शिवरायांनी प्रथम पासून बाळगला होता. 
   युवराज संभाजी राजे प्रशासनातील अण्णाजी दत्तो वगैरे व्यक्तींच्या भ्रष्टाचाराबद्दल शिवरायाकडे तक्रारी सांगत असत; पण ज्यांनी स्वराज्य निर्मितीच्या कार्यात सुरुवातीपासून हातभार लावला होता  अशा व्यक्तीबरोबर शिवराय कधीच नाराजीने वागत नसत. ते स्वतः प्रधानमंडळा बरोबर संयमीपणे वागत असत. शिवरायांनी स्वतःचा संयम सोडून प्रशासनातील अधिकाऱ्याना दूर केले असते तर ते अधिकारी शत्रूच्या गोटात जाऊन विरोधात  उभे राहिले असते. शिवरायांनी तसे होऊ दिले नाही. ते आपल्या अधिकारी वर्गाला आपल्या कर्तव्याची सतत जाणीव करून देत असत. 
   दिलेरखानाच्या गोटात सामील झालेल्या युवराज संभाजीना जेंव्हा भूपाळ गडावर [ चांकनचा किल्ला.] चढाई केली , त्यावेळी संभाजी राजांची आज्ञा प्रमाण मानून फिरंगोजी नरसाळा  यांनी किल्ल्याचे दरवाजे उघडून संभाजीराजांच्या सैन्याला गडात प्रवेश करून दिला. त्यामुळे फिरंगोजी नरसाळा  यांच्या कडून झालेल्या गुन्ह्याबद्दल त्यांना कडेलोटाची शिक्षा न करण्याचा संयम शिवरायांनी पाळला होता. 
  शिवराय युद्धातील शत्रूकडील पकडल्या गेलेल्या सरदार व सैनिकांना कैद करून ठेवीत नसत. तसेच त्यांना कोणताही त्रास होवू  नये या बद्दल दक्षता घेत असत. शत्रूकडील सैन्य हे आज ना उद्या आपलीच प्रजा होणार आहे. या बद्दल शिवरायांना ठाम विश्वास होता. शिवरायांच्या संयमाचा हा वेगळा पैलू होता भावी प्रजेच्या बाबतीतील . 
   मानवतावादी शिवराय आपल्या मोहिमेत स्त्रिया , अर्भके , गरीब, साधू, संत , अवलिया , प्रार्थनास्थळे , धर्मग्रंथ यांना तोशीश होऊ नये , तसेच लष्करात बायको, बटकीन व कलावंतीण यांचा शिरकाव होऊ नये याबद्दल अत्यंत दक्ष असत. या बाबत सैन्याने संयमाने वागावे म्हणून लष्कराला सतत आज्ञा देत असत. हा संयम शिवराय अगदी कटाक्षाने पाळीत असत. 
   शिवरायांचे आणखी एक मानवतावादी धोरण होते . युद्धात कमीत कमी सैन्य हानी कशी होईल याकडेही त्यांचा कटाक्ष होता. तसेच युद्धानतर  व्यर्थ  कत्तल होऊ नये याबाबतही ते अगदी संयमाने वागत असत.  
   स्थितप्रज्ञ सेनानीला व आदर्श राजाला शोभणारा हा असा शिवरायांचा संयमीपणा होता म्हणून ते राजे होते.

Post a Comment

Previous Post Next Post