अन् त्यांनी दिल्या लग्नात वेगळ्या घोषणा... भारत माता की जय, जय हिंद, पंडित जवाहरलाल नेहरू की, महात्मा गांधी की


मुंबई, 08 फेब्रुवारी : सोशल मीडियावर लग्नाचे व्हिडीओ खूप व्हायरल होत असतात. यामध्ये नवरदेव-नवरीच्या कपड्यांपासूनलग्नातील गाणी आणि विधींचे व्हिडीओ देखील आवडीने पाहिले जातात. यात काही फनी व्हिडीओ देखील असतात. तर काही व्हिडीओ हेविचित्र असतात. सध्या सोशल मीडियावर नवरदेव-नवरीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. लग्नाच्या विधीदरम्यान हाल घालतानाच्या विधीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

लग्न म्हटलं की त्यामध्ये मंगलाष्टकं, शुभमंगल सावधान असे सूर ऐकायला मिळतात. पण या लग्नात मात्र शुभमंगल सावधानऐवजी वेगळंच काही तरी ऐकायला मिळालं. जसा नवरा-नवरीने एकमेकांना हार घातला तसा वेगळ्याच घोषणांनी लग्नमंडप दुमदुमला. हे पाहून सर्वजण आश्चर्यचकीत झाले आहेत

व्हिडीओत पाहू शकता नवरा-नवरी हार घालून एकमेकांसमोर उभे आहेत. स्टेजवर वराच्या मागे काही लोक उभे आहेत. जे मोठमोठ्याने ओरडत आहेत. भारत माता की जय अशा घोषणा ते देत आहे. अर्थात लग्नात अशा घोषणा देणारे हे लोक म्हणजे नवरदेवाचेच मित्र आहेत. लग्न म्हटलं की मजामस्ती आली आणि खासकरून नवरदेवाचे मित्र तर नवरा-नवरीला असा त्रास देण्याची एक संधी सोडत नाहीत. पण या मित्रांनी मात्र हद्दच केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post