विवाह इच्छुकांनो, पालकांनो... वाचा! विचार करा! पटलं तर विचारांमध्ये, अपेक्षांमध्ये लग्न लवकर जमण्यासाठी योग्य बदल करा!


          *"परिचय पञ"*
नांव :- चि./कु.
जन्म तारीख :- DD/ MM/YYYY
जन्म ठिकाणः- अपेक्षांच गांव
जन्म वेळ :-xx.xx Am/Pm.
शिक्षण :- डिग्रींची कमी नाही.
व्यवसाय :- सरकारी नोकरी, शेती, मोठा बिझनेस
पगार :- अमाप
उंची :- शोभेल अशी
रंग :- गोरापान
वडीलांचे नांवः- श्री ....... शेठ यांचा/
                     यांची मुलगा/ मुलगी
मामाचे कुळ :- नडत नाही.
पत्ता :- रा.अलिकडे ता. पलिकडे
                      जि. असेल तो 

 *अपेक्षा मुलींचीः-* 
१. मुलगा देखणा पाहिजे.
२. सरकारी नोकरी वाला पाहिजे. (आणि ही १० वी पास का असेना)
३. स्वतःचा बंगला असावा. (हिचं इकडं भाड्याच्या घरात आयुष्य निघतयं)
४. घरी शेती असावी. ( हिला सांगितलं शेतात निंदायला जाशील का? तर हेच लोक म्हणतात आमची पोरगी शेतात जाणार नाही मग शेती का हवी यांना..?)
५. मुलगा नोकरीला असला म्हणजे पगार तगडा असावा. (इकडे तिच्या वडिलांचा ५००० रु. पगारावर अख्खा परीवार का पोसला जाईना)
६. मुलगा पुणे मुंबई स्थित असावा. आणि तिथे त्याचा स्वतःचा फ्लॅट असावा.
७. स्वतःची कार हवी ती ही आँडी,बी.एम.डब्ल्यू इ.सारखी.(हिच्या वडीलांचे आयुष्य सायकल वर किंवा पायी फिरतं चाललंय) हिला मात्र कार हवीच.
८. घरात स्वयंपाकाला,धुणी भांडी व घरकामाला बाई हवी. (मग ही दिवसभर काय काम करणार?????? फक्त मोबाईल बघनार आणि आराम करणार.)
९. मुलाला व्यसन नको ( हे ठिक आहे.)
१०. मुलगा एकटाच हवा.(लग्न झाल्यावर दोघं वेगळे राहू सासू सासरे शक्यतो नकोच.)
११. शेती,शिवणकाम,व्यवसाय करणारा नकोच. सरकारी नोकरी वालाच पाहिजे.😱

!! *मुलाच्या अपेक्षा* !!
१. सुंदर नसली तरी चालेल. पण मन मिळाऊ हवी.
२. लिहिता वाचता आले एवढं पुरे
३. सुसंस्कृत व सुशिक्षित असावी.
४. आई वडिलांनासुद्धा समजून घेणारी हवी.
५. नोकरीच करावी ही अपेक्षा नाही.
६. हूंडा नकोच.
७. ती म्हणेल तर गांव सोडून शहरात रहायला तयार.
८. मुलीवाले श्रीमंत नसले तरी चालतील.
९. शेती काम नाही येत असले तरी चालेलं.
१०.स्वयंपाक येत नसेल तरी चालेल. शिकवला जाईल.
....................................................
मुलांच्या काही एवढ्या अपेक्षा नसतांनाही मुलींच्या व त्यांच्या पालकांच्या अपेक्षा दिवसेंदिवस वाढतचं चालल्या आहेत. इकडे मुलींचं वय या अपेक्षांमुळे वाढतं जातं..... घरच्यांच्या अपेक्षेमुळे मुलीला मुलगा पसंत असतांनाही केवळ घरच्यांच्या अपेक्षांमुळे तो संबंध जुळत नाही. मग काय शेवटी मुलगी कंटाळते आणि आंतरजातीय,लव्ह मॅरेज करुन मोकळी होते. मग हेच लोक तिची पसंती होती म्हणून केलं असं सांगून मोकळे होतात. मग यांनांच विचारलं की जावई काय करतो..? तर हे सांगतात पुण्याला किंवा मुंबईला आहे म्हणून मग तो तिकडे हमाली का..? करेना.....कवडीचं व्यसन नाही म्हणतात अनं तो दिवसभर गटारात लोळतो🍷🥂🥃

प्रत्येक समाजात,गावागावात मुला मुलीं विषयी सांगणारे चुगलिखोर लोक असतात परंतू मुलं मुलीच्या वडिलांनी सर्व गोष्टींची शहानिशा किव्हा सरळ मुला मुलींना विचारून समस्या दुर करण्यासाठी पालकांनी प्रयास केला पाहिजे.


*शेवटी मुलीला आवडलं म्हणून तिने केलं असं बोलून मोकळे होतात.*
*बघा जातीचा मुलगा असतांनाही एवढ्या* *अपेक्षा..? अनं परक्याला सर्व मुभा..!!* 
🌷🌹☘🌷🌹☘🌷🌹☘🌷🌹☘ *खरंच जग किती बदललंय नाही..?* ☘🌹 
असंच आता सगळीकडे जास्त निदर्शनास येतं आहे. 🌷🌹☘🌷🌹☘🌷🌹☘ आवडलं म्हणून शेअर केलं पण नुसतंचं वाचून चालणार नाही. आवश्यक आहे तो *"बदल"*
आणि कृतीही तितकीच महत्वाची.
जास्त अपेक्षा ठेऊ नका.
शिवणकाम अथवा कुठला चांगला उद्योग करणारा खाजगी कंपनीत असलेला मुलगा असेल तरी त्याला आपली मुलगी द्या.
प्रत्येकालाच सरकारी नोकरीवाला मुलगा मिळेलच असेही नाही.
शेतात काम करण्याची लाज वाटत असेल तर मग शेती कशाला हवी..? कार, बंगला कशाला हवा..?
*👉🏻 अति अपेक्षा सोडा आणि चांगले माणसे जोडा.*🙏🏻🙏🏻
 *कृपया राग नसावा सत्य परिस्थिती आहे*🙏🙏
 ✍ तुम्हालाही हे विचार आवडले असतील तर पुढे जसेच्या तसे पाठवा.🙏
🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹

By Nilesh...

Post a Comment

Previous Post Next Post