चुलत भावानेच बहिणीवर केला अत्याचार


 अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल




अमरावती = भावाचे बहिणीचे रक्षण करण्याची जबाबदारी असताना नराधम चुलत भावाची वाईट नजर चुलत बहिणीवर पडली. तिला प्रेमजाळ्यात अडकावून तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्तापित केले. यामध्ये अल्पवयीन युवती ही तीन महिन्यांची गर्भवर्ती राहिली. डॉक्टरांकडे तपासणीसाठी नेले असता पोलिसांत तक्रार देण्याचे सांगितले. आईने युवतीला घेऊन पोलिसांत तक्रार दाखल केली.

पीडित युवतीचा चुलत भाऊ याने तू माझी बहीण आहेस, हे मला माहित आहे; पण तू मला खूप आवडते. मी तुझ्यावर प्रेम करतो, असे म्हटले. त्यावर युवतीने त्याला नकार दिला; मात्र त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. तेव्हापासून दोघेही एकमेकांसोबत मोबाईलवर बोलत होते. आरोपी केली. चुलतभाऊ (१९) रा. हिवरखेड ता. तेल्हारा जि. अकोला याने चार महिन्यांपूर्वी शारीरिक संबंध प्रस्तापित केले. घरातील लोक मारतील, या भीतीने युवतीने ही बाब कुणालाही सांगितली नाही.


युवतीने मासिक पाळी दोन महिन्यांपासून आली नाही, असे मैत्रिणीला सांगितले. पीडितीने आई व आजीला ही बाब सांगितली. तक्रार केल्याशिवाय डॉक्टर उपचार करीत नव्हते. त्यामुळे पोलिसांत तक्रार दाखल केली 

पोलिसांनी आरोपीविरूध्द कलम ३७६ (३) ३७६ (२), पोस्को अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाच तपास सिटी कोतवाली पोलिस करीत आहे. पोलिस आरोपीचा शोध घेत आहे..

Post a Comment

Previous Post Next Post