सट्टापट्टीवर केली एलसीबीने कारवाई दोघांना अटक : 43 हजारांचा मुद्देमाल जप्त




स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर (LCB)

 चंद्रपूर . स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बल्लारपूर शहरात विविध ठिकाणी अवैध प णे सट्टापटीवर धाड टाकून दोघांना अटक केली. 9 फेब्रुवारीला ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी 43 हजार 110 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मोहन टोकलवार व पवन भगत यांशी अटकेतील आरोपींची नावे आहे.

विशेष म्हणजे, पोलिस निरीक्षक महेश कोंडावार हे दोन दिवसांपूर्वीच स्थानिक गुन्हे शाखेत रुजू होताच त्यांनी अवैध धंद्याविरोधात कडक कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे अवैध धंदे करणाऱ्या व्यवसायिकांचे चांगलेच धाबे दणाणले आहे..

Post a Comment

Previous Post Next Post