ऐकावं ते नवलच... येथे नववधू रडली नाही तर तिला मारतात!



चीन: नवरीची पाठवणी हा लग्नातील सर्वात भावनिक क्षण असतो, नवरी तिच्या माहेरच्या मंडळींचा निरोप घेत असते. त्यावेळी सर्वांच्या अश्रूंचा बांध फुटतो. भारतात हे दृश्य सर्रास पाहण्यास मिळतं.

पण तुम्हाला माहिती आहे का, भारताप्रमाणे चीनमध्येही ही परंपरा एका ठिकाणी आहे. मात्र ती आपल्यापेक्षा जास्त विचित्र आहे. कारण जर लग्नाच्या वेळी य़ेथे नवरी रडली नाही, तर तिला मारहाण करून रडण्यास भाग पाडल जातं. ऐकण्यास हे थोडे विचित्र वाटत असले तरी खरे आहे.

चीनमधील तुझिया जमातीचे लोक हजारो वर्षांपासून चीनचा नैऋत्य प्रांत सिचुआनमध्ये राहतात. इथे एक विचित्र परंपरा पाळली जाते, ती म्हणजे नवरीला लग्नात रडणं आवश्यक आहे. ऑडिटी सेंट्रल वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, ही परंपरा 17 व्या शतकापर्यंत शिखरावर होती, आणि 1911 मध्ये क्विंग साम्राज्यापर्यंत ती चालू होती. मात्र, कालांतरानं ही प्रथा लोप पावत चालली आहे. तुझिया जमातीत लग्न झाल्यानंतर नवरी रडली नाही, तर ती गावात चेष्टेचा विषय बनते. परिसरातील लोक त्या वधूला तिच्या कुटुंबातील सर्वात वाईट मानतात. बऱ्याचदा नवरीला लग्नानंतर रडू आलं नाही, तर ती जोपर्यंत रडत नाही, तोपर्यंत तिची आई तिला मारते.

विशेष म्हणजे पश्चिम प्रांतात ही प्रथा काहीशी वेगळी आहे. तिथे त्याला 'जुओ टांग' म्हणजेच हॉलमध्ये बसणं, असं म्हटलं जातं. लग्नाच्या एक महिना आधी, दररोज रात्री वधू एका मोठ्या हॉलमध्ये जाते, आणि तिथे बसून सुमारे एक तास रडते. 10 दिवसांनी तिची आईही तिच्यासोबत हॉलमध्ये बसून रडते. त्यानंतर पुन्हा 10 दिवसांनी वधूचे आजी, बहीण, काकू, मावशी असे सगळे हॉलमध्ये एकत्र येऊन रडतात. यासर्व महिला रडत असताना हॉलमध्ये एक खास गाणं सुरू असतं, ज्या गाण्याला 'क्रायिंग मॅरेज साँग' म्हणतात.

Post a Comment

Previous Post Next Post