मद्दीगुडम येथे अपघात, एक युवक ठार ट्रकची दुचाकीला धडक


    गडचिरोली :- तेलंगणातील कागजनगर निवासी निखिल नीलकंठ सेपाई हा दुचाकीने जात असताना मद्दीगुडम जवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली.
    आरोपी राकेश दिवाकर समर्थ ट्रक चालक हा ट्रक क्रमांक एम एच १३ CU ०४२० हा त्याच्या ताब्यातील ट्रक घेऊन जात असताना ट्रक हयगयीने व निष्काळजीपणाने चालवून मोटार सायकल क्रमांक टी एस २०B ०५६४ चालवीत असलेल्या निखिलला मद्दीगुडम जवळ जोरदार धडक  दिली. परिणामी पोटावरूनच चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.
    आरोपी ट्रक ड्रायव्हरवर कलम ३०४अ भादंवी व मोटार वाहन नियम कायदा सह कलम १३४, १८४ नुसार अहेरी पोलीस स्टेशनमध्ये मृत्तकाचे वडील तापस सेपाईने गुन्ह्याची नोंद तक्रारीवरून केली आहे.
अधिक तपास पीएसआय चव्हाण, माननीय पीआय किशोर मानभाव यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post